सीटी स्कॅन नोंदीत झोल करून हॉस्पिटलला 17 लाखांचा गंडा; दोन कर्मचारी नाशिकमधून रफूचक्कर
चक्क सीटी स्कॅन नोंदीमध्ये झोल करून नाशिकमधल्या एका नामांकित हॉस्पिटलला कर्मचाऱ्यांनी 17 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
नाशिकः चक्क सीटी स्कॅन नोंदीमध्ये झोल करून नाशिकमधल्या एका नामांकित हॉस्पिटलला कर्मचाऱ्यांनी 17 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हॉस्पिटलच्या तक्रारीवरून दोघांविरोधात मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, मुंबई नाका येथे सुयश हे खासगी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटमधील सीटी स्कॅन विभागात योगेश खकाळे आणि ज्ञानेश्वर भारूड हे काम करायचे. त्यांनी आपल्या कामाने हॉस्पिटल प्रशासनाचा विश्वास प्राप्त केला होता. मात्र, काही दिवस झाल्यानंतर त्यांची नियत फिरली. झटपट पैसे कमावण्याचा एक मार्ग त्यांना हॉस्पिटलध्येच गवसला. विशेष म्हणजे याची कुणकुणही कुणाला लागण्याचा प्रश्न नव्हता. त्यांनी फक्त इतकेच केले की, सीटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांच्या नोंदीच केल्या नाहीत. म्हणचे कसे तर एप्रिल महिन्यात एकूण 547 रुग्णांचे सीटी स्कॅन हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. मात्र, यांनी फक्त 344 जणांचे सीटी स्कॅन केल्याची नोंद केली, तर उर्वरित 203 रुग्णांचे रकॉर्ड गहाळ केले. याचाच कित्ता त्यांनी मे महिन्यातही गिरवला. या काळात हॉस्पिटलमध्ये 179 सीटी स्कॅन झाले. मात्र, या दोघांनी कागदोपत्री 159 रुग्णांची नोंद केली. या दोन महिन्यातच त्यांनी 10 लाख 15 हजारांची माया जमवली. तर जुलै महिन्यात पावणेसहा लाख कमावले.
10 फिल्म बॉक्सची विक्री
योगेश खकाळे आणि ज्ञानेश्वर भारूड यांना पैशाची चटक लागली होती. रुग्णांच्या कमी नोंद केल्यानंतर त्यांनी इतर ठिकाणी हात मारायला सुरुवात केली. त्यात 10 फिल्म बॉक्सची परस्पर बाहेर विक्री केली. असे एकेक घोळ करून कुणालाही काहीही न कळता त्यांना पैसे मिळत असल्याने ते अक्षरशः निर्ढावले होते. त्यांनी पुढचा पल्ला गाठला. मशीन बिघडल्याचे हॉस्पिटल प्रशासनाला सांगितले. त्यातही पैसा कमावला. मात्र, याचे बिंग फुटले आणि तब्बल एकूण 17 लाखांचा गंडा हॉस्पिटलला घातल्याचे उघड झाले.
इतर ठिकाणी हात मारला का?
तूर्तास तरी या दोघांनी सुयश हॉस्पिटलमध्ये केलेले काही घोळ समोर आले आहेत. आता या आरोपींनी हॉस्पिटलच्या इतर विभागामध्ये काही रफूचक्कर केले आहे का, याचा तपास प्रशासनाने सुरू केला आहे. कदाचित यानंतरही अशी एकदोन प्रकरणे समोर आल्यास आश्चर्य वाटायला नको. सध्या तरी याप्रकरणी डॉ. गौरव खैरनार यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
इतर बातम्याः
टी-20 वर्ल्डकप सामन्यांवर सट्टा; नाशिकमध्ये 5 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना बेड्या
Aishwarya Rai birthday | ‘ब्युटी विथ ब्रेन’ ऐश्वर्या राय बच्चन करोडोंची मालकीण, जाणून घ्या तिच्या संपत्ती बद्दल सर्वकाही https://t.co/5HPo7PycnW#AishwaryaRai | #AishwaryaraiBachchan | #AishwaryaRaiBachchan
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2021