Video | Shocking | Tragedy | गळफास घेण्याची एक्टिंग करताना स्टूलवरुन पडला आणि…
सोशल मीडियाचं वेड नाही, अशी फार कमी लोकं आजूबाजुला आहेत. मात्र ज्यांना सोशल मीडियाचं वेड लागलं, त्यांना आपल्या जीवाचीही काही किंमत राहिलेली नाही, हे अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे.
इंदोर : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दहावीतील मुलाला गळफास घेतानाचा (10th Student lost his life) Reel Video बनवणं जिवावर बेतलंय. व्हिडीओ (Video) बनवत असताना चुकून स्टूल सटकल्यानं गळफास लागून दहावीच्या मुलाला जीव गमावावा लागला आहे. सोशल मीडियावर अपलोड (Upload) करण्यासाठी हा मुलगा एक व्हिडीओ तयार करत होता. त्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना जेव्हा घडत होती तेव्हा जीव गमावलेल्या मुलाचे तीन मित्रही सोबत होते. मात्र स्टूल सटकल्यानंतर भयभीत झालेल्या मित्रांनीही घटनास्थळावरुन पळ काढला.
नेमकी घटना कुठची?
ही धक्कादायक घटना घडली आहे इंदोरमध्ये (Indore). सोशल मीडियाच्या (Social Media) वेडापायी 17 वर्षीय आदित्य नायकनं (Aaditya Nayak) आपला जीव गमावला आहे. मंगळवारी ही घटना घडली असून फाशीचा व्हिडीओ बनवण्याचा नाद आदित्यच्या अंगलट आलाय.
कळलं कसं?
ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा आदित्यचे आई वडील घराबाहेर गेले होते. साधारण अर्ध्या तासानंतर जेव्हा आदित्यचा भाऊ घरी आला, तेव्हा डोळ्यांसमोर जे दिसलं, त्यानं आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यानंतर आदित्यच्या आई-वडिलांना याबाबतची माहिती देण्यात आली.
घटनेनंतर आदित्यच्या वडिलांनी सांगितलं की, आदित्य हा दहावीचा विद्यार्थी होता. पण सोशल मीडियाच्या नादापायी त्यांनी आपल्या मुलाला गमावलंय. सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंटच्या नादामुळे मुलं धोका पत्करुन काहीही करायला तयार होतात. असं करणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांना असं करण्यापासून वेळीच रोखायलं हवं, असं आवाहनही आदित्यच्या वडिलांनी केलंय.
A class 10th student Aditya Nayak from Indore was trying to shoot #Insta_reel of his “fake suicide”.
When he was standing on a table with a rope around his neck, he lost balance after his 1 leg slipped from the chair. His brother rushed him to hospital but he died. @newsclickin pic.twitter.com/3p9IQ9lXEu
— काश/if Kakvi (@KashifKakvi) December 14, 2021
स्थानिक पोलिस काय म्हणाले?
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, आदित्य सोशल मीडियावर बराच एक्टीव्ह होता. असंख्य रील्स आदित्यनं बनवले होते. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आदित्यनं आपल्यापेक्षा कमी वयाच्या तीन मित्रांना घरी बोलावलं होतं. आदित्यनं पंख्याला दोर बांधला. त्यानंतर त्यानं आपल्या मित्रांना ट्रायल दिल्यानंतर व्हिडीओ बनवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र या सगळ्या गोष्टी करत असतानाच स्टूलवरुन पाय घसरुन आदित्यच्या मानेला गळफास बसला. तडफडणाऱ्या आदित्यला पाहून त्याच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या त्याच्या मित्रांनी घाबरुन पळ काढला.