Mumbai Crime | कामाहून परतताना 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 जणांविरोधात गुन्हा, दोघे अल्पवयीन

मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. चार युवकांनी मिळून एका 20 वर्षीय युवतीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन जणांना अटकसुद्धा केलं आहे. काही महिन्यांपूर्वी डोंबिवली येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता.

Mumbai Crime |  कामाहून परतताना 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 जणांविरोधात गुन्हा, दोघे अल्पवयीन
सांकेतिक फोटो Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 8:48 AM

मुंबई : मुंबईतील (Mumbai) गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. चार युवकांनी मिळून एका 20 वर्षीय युवतीवर बलात्कार (Rape) केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन जणांना अटकसुद्धा केलं आहे. काही महिन्यांपूर्वी डोंबिवली (Dombivli Rape Case) येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता गोवंडी येथे वीस वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर रोष व्यक्त केला जातोय. तसेच या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या बाकीच्या दोन आरोपींनाही तत्काळ अटक करुन कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे.

कामावरुन परतताना आळीपाळीने अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार पीडित वीस वर्षीय युवती एका हॉलमध्ये केटरिंगचे काम करते. सकाळी काम आटोपून युवती आपल्या घरी जात होती. यावेळी ओळखीच्या एका युवकाने तिला इतक्या उशिरा कुठे गेली होती असं विचारलं आणि तुझ्याशी काही बोलायचे असं म्हणून एका निर्मणुष्य झोपडीत नेले. त्याच वेळी त्याचे 3 साथीदारही त्या ठिकाणी आले. या तिघांनी नंतर आळीपाळीने युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेले. आरोपी गेल्यानंतर या युवतीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपबीती सांगितली.

दोन आरोपी अल्पवयीन, दोघांचा शोध सुरु

ही माहिती समजताच पोलीस दलातील निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पीडितेला पोलीस ठाण्यात आणून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या संदर्भात पोलिसांनी 10 पथकं तयार करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत यातील दोन आरोपी उत्तर प्रदेश येथील वस्ती जिल्ह्यात आपल्या गावी निघून जाण्याच्या तयारीत होते. पण पोलिसांनी या दोन्ही आरोपीना डोंगरी येथून अटक केलं. तर बाकीच्या दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे अल्पवयीन आहेत. तर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिली.

इतर बातम्या :

Murbad Crime : मुरबाडमध्ये तरुणांची ‘मजा’ बनली ‘सजा’, गंमतीशीर व्हिडीओ बनवल्यानं तरुणांना मारहाण

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात कुख्यात गुंडाची भर रस्त्यावरून धिंड; तुळिंज पोलिसांची धाडसी कारवाई

Mumbai Fire : कमला इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका उपायुक्तांची चौकशी समिती स्थापन, 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.