आधी घरी बोलावलं, कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं; तरूणी बेशुद्ध होताच…
सध्याच वातावरण खूप भयानक आहे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हाच प्रश्न आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडल्याचे उघडकीस आले. एका महिलेने 22 वर्षांच्या तरूणीला घरी बोलावून, कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले.
सध्याच वातावरण खूप भयानक आहे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हाच प्रश्न आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडल्याचे उघडकीस आले. एका महिलेने 22 वर्षांच्या तरूणीला घरी बोलावून, कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले. त्या महिलच्या पतीनेच त्या तरूणीच्या बेशुद्धावस्थेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि महिलेने त्याचे रेकॉर्डिंग केले. एवढंच नव्हे तर तर ती मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिला हा व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करून तिच्याकडून खंडणीही मागण्यात आली. याप्रकरणी बलात्कार, खंडणी मागितल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
नक्की काय झालं ?
पीडित तरूणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी महिलेने पीडित तरूणीला तिच्या घरी बोलावले होते. त्यावेळी तिला कोल्डड्रिंक प्यायला दिलं, मात्र त्यामध्ये गुंगीचं औषध घातलं होतं. ते पिताच पीडित तरूणी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी महिलेच्या पतीने तरूणीवर बलात्कार केला व आरोपी महिलेने त्याचे चित्रीकरण केले. ही तरूणी शुद्धीवर आल्यावर आरोपी महिलेने तिला तो व्हिडीओ दाखवला. ते पाहून ती हादरलीच. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करू अशी धमकी देत आरोपी महिलेने त्या तरूणीकडे खंडणी म्हणून 10 हजार रुपयांची मागणी केली. पीडित तरूणी अतिशय घाबरली होती. तिने हा सगळा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. त्यावेळी तिने तात्काळ पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार पीडित तरूणीने मालवणी पोलिस स्टेशनमध्ये सगळा प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, गुंगीचे औषध देणे, धमकावणे, खंडणीची मागणी करणे व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तातडीने तपास करत पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली मात्र तिचा पती अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.