पोलीस असल्याचं भासवत लुटलेला दीड कोटीचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांकडून अवघ्या 72 तासांत आरोपींना बेड्या

णे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 72 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 54 हजार 540 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय.

पोलीस असल्याचं भासवत लुटलेला दीड कोटीचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांकडून अवघ्या 72 तासांत आरोपींना बेड्या
एसटी बसमध्ये दीड कोटीची लूट करणारे 3 आरोपी ताब्यात
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 2:36 PM

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर 6 जणांनी एक एसटी बस अडवून तब्बल दीड कोटीचा मुद्देमाल लंपास केला होता. महत्वाची बाब म्हणजे या आरोपींनी पोलीस असल्याचं भासवत ही लूट घडवून आणली होती. पोलिसांचा गणवेश परिधान करत या आरोपींनी पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बस थांबवली. त्यानंतर एसटीतील 4 जणांना त्यांच्या बॅगसह खाली उतरवलं. त्यानंतर त्या प्रवाशांजवळील दीड कोटीचा मुद्देमाल घेत तिथून पोबारा केला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 72 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 54 हजार 540 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. (3 accused in ST bus robbery arrested by Pune Rural Police)

पुणे जिल्ह्यातील पाटस टोल नाक्यावर हा लुटीचा प्रकार घडला होता. हितेंद्र जाधव यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. हे प्रवाशी एका कुरिअर कंपनीचे पैसे घेऊन जात होते. निलंगा, लातूर आणि सोलापूर इथून कुरिअर कंपनीचे लोक एसटी बसमध्ये बसले होते. त्यावेळी एसटी बसला गाडी आडवी लावून आरोपींनी प्रवाशांची लूट केली होती. त्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपयांची ही लूट होती. पोलिसांनी अवघ्या 72 तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एकूण 6 आरोपींपैकी 3 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. तर तीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती मिळतेय.

3 आरोपींना बेड्या, 3 आरोपींचा शोध सुरु

पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेले हे आरोपी शिरुर तालुक्यातील आहेत. रामदास भोसले (30 वर्षे), तुषार तांबे (22 वर्षे), भरत बांगर (36 वर्षे) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी लुटलेली रक्कम एका उसाच्या शेतात लपवून ठेवली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक स्विफ्ट कार, एक बुलेट आणि एक ज्युपिटर मोटार सायकल जप्त केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

पोलिसांना संशय

दरम्यान, या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. पैसे घेऊन जाणाऱ्यांपैकी कुणीतरी आरोपींना माहिती दिल्याचा पोलिसांना संशय आहेत. डिजिटल व्यवहार होत असताना एवढी मोठी रक्कम बसने मुंबईला का घेऊन जात होते? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलीस तपास करत आहेत.

इतर बातम्या :

पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, तलवार-पिस्तुलीसह डान्स, 22 वर्षीय तरुणाला अटक

गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पीडितेकडे 10 लाखांची मागणी

3 accused in ST bus robbery arrested by Pune Rural Police

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.