एक नवरी, चार उतावळे नवरदेव; चौघेही एकत्र आले अन्…

भोपाळमध्ये एका नवरीने चार उतावळ्या नवरदेवांना ठकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (4 grooms came together to marry the same bride with a wedding procession in bhopal)

एक नवरी, चार उतावळे नवरदेव; चौघेही एकत्र आले अन्...
wedding
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 2:34 PM

भोपाळ: भोपाळमध्ये एका नवरीने चार उतावळ्या नवरदेवांना ठकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरी गायब झाली म्हणून चौघेही एक एक करून पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर त्याच नवरीच्या शोधात आणखीही काही नवरदेव पोलीस ठाण्यात आल्याचं त्यांना दिसून आलं. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधित तपास सुरू केला आहे. (4 grooms came together to marry the same bride with a wedding procession in bhopal)

भोपाळच्या कोलार येथे ही धक्कादायक घटना घडली. हरदा येथे राहणारा एक तरुण गुरुवारी लग्न करण्यासाठी कोलारमधील जन कल्याण समितीच्या कार्यालयात पोहोचला होता. मात्र कार्यालयाला कुलूप लागलेलं पाहून त्यांनी शेजारी राहणाऱ्या लोकांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांना ते सांगत असलेल्या नावाची एकही व्यक्ती इथे राहत नाही. त्यानंतर त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन केला. तेव्हा फोनही बंद होता. त्यामुळे काही तरी गडबड असल्याचा संशय आल्यानंतर नवरदेव आणि त्याचे नातेवाईक थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर तिथे आधीच तीन नवरदेव असल्याचं त्यांना दिसून आलं. विशेष म्हणजे हे तिन्ही नवरदेव त्याच मुलीशी लग्न करण्यासाठी आले होते. ही माहिती उघड झाल्यानंतर चौघांनाही लग्नाच्या नावाने आपली फसवणूक झाल्याचं समजून आलं.

अशी करायचे फसवणूक

हरदा येथे राहणाऱ्या नवरदेवाने तक्रार केल्यानंतर कोलार पोलीस ठाण्यात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास केला असता तीनजण याबाबतचं रॅकेट चालवत असल्याचं दिसून आलं आहे. एक महिला आणि दोन पुरुष ही फसवणूक करत असल्याचं आढळून आलं आहे. ज्या जिल्ह्यात पुरुषांचे लग्न जुळत नाहीत, ज्यांना नवरी मिळणे अत्यंत अवघड आहे, अशा ठिकाणी जाऊन हे लोक सोयरीक जुळवायचे. सुयोग्य वधू मिळेल असा प्रचार हे लोक करायचे. प्रचार करताना त्यांचा नंबरही द्यायचे. त्यामुळे लग्नाला अधीर झालेले लोक त्यांना फोन करायचे. त्यानंतर हे लोक या लोकांना भोपाळला बोलवायचे. त्यानंतर लेबर चौकातून 200 रुपये किंवा 500 रुपये देऊन एखाद्या मुलीला घेऊन यायचे आणि त्यांना हीच नवरी असल्याचं म्हणून सांगायचे. मुलगी पसंत आल्यानंतर नवरदेवाकडून 20 हजार रुपये घ्यायचे, असं सीएसपी भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं.

टोळी पकडली

पोलीस ठाण्यात तक्रार करणाऱ्या चारही नवरदेवांना या टोळीने प्रत्येकी 20 हजार रुपयांना ठकवले होते. या तक्रारीनंतर टोळीतील तिघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चौकशी करण्यात येत असून त्यांनी अजून किती लोकांना ठकवलं आहे, याचा तपास केला जात आहे. (4 grooms came together to marry the same bride with a wedding procession in bhopal)

संबंधित बातम्या:

अरेरे! नक्षलवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी DRDO ने तयार केलेला अत्याधुनिक ड्रोन कोसळला

10 वी नापास भामट्याचा पोलिसाला दीड कोटीचा चुना, वकील आणि इतर पोलिसांचीही फसवणूक

वाढदिवसाला बोलावून 14 वर्षाच्या मुलीवर गँगरेप, पुणे हादरलं!

(4 grooms came together to marry the same bride with a wedding procession in bhopal)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.