Nanded accident : दर्ग्याच्या दर्शनानंतर पोहायला गेले, कंधारच्या तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू, सर्व मृतक नांदेडचे रहिवासी

नांदेड : जिल्ह्यातील कंधार येथील जगतुंग तलावात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. दोन सख्खे भाऊ तर अन्य तीन जण चुलते आहेत.

Nanded accident : दर्ग्याच्या दर्शनानंतर पोहायला गेले, कंधारच्या तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू, सर्व मृतक नांदेडचे रहिवासी
कंधारच्या तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यूImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 5:17 PM

नांदेड : जिल्ह्यातील कंधार येथील जगतुंग तलावात (Jagtung Lake) बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. दोन सख्खे भाऊ तर अन्य तीन जण चुलते आहेत. नांदेड शहरातील (Nanded City) खुदबई नगर (Khudbai Nagar) येथील दोन कुटुंब कंधार येथील दर्गाच्या दर्शनासाठी गेले होते. महिला आणि लहान मुलं दर्गामध्ये होते. पाच जण तलावात पोहण्यासाठी गेले. पण अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले. महोमद विखार, महोमद साद, सय्यद सोहेल, सय्यद नाविद आणि महोमद आफ्रिदीन अशी मृतकांची नावं आहेत. सर्वजण 13 ते 23 वयोगटातील आहेत.

अशी आहेत मृतकांची नावं

मोहम्मद विखार (वय 23), मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन (वय 15), सय्यद सोहेल सय्यद वाहिद (वय 20), मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार (वय 45), सय्यद नवीद सय्यद वाहिद (वय 15) अशी मृतकांची नाव आहेत. हे सर्व युवक नांदेडच्या खुदबेनगर येथील रहिवासी आहेत.

नेमकं काय घडलं

नांदेडमधील खुदबई नगर येथील दोन कुटुंब कंधार येथे गेले होते. त्याठिकाणी त्यांनी दर्ग्याचे दर्शन घेतलं. लहान मुलं आणि महिला या दर्ग्यामध्येच होते. कुटुंबातील तरुण मुलं तलावात पोहण्यासाठी गेले. पण, पाण्याचा अंदाज काही आला नाही. त्यामुळं बुडून त्यांचा मृत्यू झाला. पाच जण बुडाल्याचं लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आलं. पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. कंधार येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आले. यावेळी अनेक लोकांनी गर्दी केली. दोन कुटुंबातील हे तरुण होते. घरचे कर्ते तरुण गेल्यानं कुटुंबीयांत दुःखत वातावरण आहे. तरुण पाण्यात पोहोयला गेले नसते तर परिस्थिती वेगळी राहिली असती.

हे सुद्धा वाचा

तरुणांची हौस जीवावर बेतली

हे पाचही तरुण दर्शन घेतल्यानंतर मजा करायला पाण्यात गेले. पण, पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले. आपण मजा करू असं त्यांना वाटले. पण, ही मजा त्यांच्या जीवावर बेतली. सर्वजण 13 ते 23 वयोगटातील आहेत. या वयात मुलं घरच्यांची मदत करतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.