‘या’ शहरात 600 किलो भांग कुठून आली? अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईनं शहरात खळबळ
तब्बल साडेतीन लाख रुपयांची सहाशे किलो भांग अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी पोलीसांच्या एका कारवाईत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.
नाशिक : नाशिकच्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाण म्हणून शालीमार परिसर ओळखला जातो. याच परिसरातील वावरे लेनमध्ये नाशिक शहर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई झाल्याने पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानेही कारवाई केली आहे. त्यामुळे स्थानिक पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पत्र्याच्या शेडमधून सर्रासपणे भांग विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून साडेतीन लाख रुपयांची 604 किलो भांग जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात भांग आलीच कशी याबाबत पोलीस आता शोध घेत आहे.
अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या शिवाजीरोड शालीमार येथील वावरे लेनमधील म्हसोबा मंदिराच्या शेजारी ही कारवाई करण्यात आली आहे.
पत्र्याच्या शेडमधून सर्रासपणे भांग विक्री केली जात होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत यामध्ये 604 किलो भांग जप्त करण्यात आली आहे.
अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणारे किंवा विक्री करणाऱ्यावर कारवाईचे आदेश अमली पदार्थ विरोधी पथकाला पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते.
पवन युकदेव वाडेकर आणि ज्ञानेश्वर बाळु शेलार या दोघांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे. दोघेही नाशिक शहर हद्दीत राहणारे आहेत.
भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांवर अवैध रित्या अमली पदार्थ बाळगणे आणि विक्री करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन युकदेव वाडेकर आणि ज्ञानेश्वर बाळु शेलार या दोघांना भांग पुरवठा करणारे नाशिक शहराबाहेरील असल्याचा अंदाज पोलिसांना आहे, त्यानुसार पोलिसांचे एक पथक याबाबतचा तपास करीत आहे.
अमली पदार्थ विक्री करणाऱ्याच्या बाबत स्थानिक पोलीस यामध्ये कारवाई करतांना दिसून येत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. विशेष पथकाने ही कारवाई केल्यानं पोलीसांच्या कामगिरीवर यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.