बुडत असल्याचं पाहून वाचवायला गेले आणि सगळेच बुडाले! चौघा अल्पवयीनांसह 7 जणांचा मृत्यू, नेमकी कुठं घडली घटना?

सात जणांचा बुडून मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

बुडत असल्याचं पाहून वाचवायला गेले आणि सगळेच बुडाले! चौघा अल्पवयीनांसह 7 जणांचा मृत्यू, नेमकी कुठं घडली घटना?
बुडून मृत्यूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 9:37 AM

मुंबई : रविवारी मावळमध्ये (Pune News) इंद्रायणी नदीत गोधडी धुवायला गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकूण सात जणांचा बुडून मृत्यू (Drowned) झाला आहे. सात मृतांपैकी चौघेजण हे अल्पवयीनं होते. ही घटनाही रविवारीच घडली. तामिळनाडूच्या (Tamil Nadu News) गेडीलाम नदीत सात जण बुडाले होते. सुरुवातीला काही जण बुडत होते. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्यांचाही बुडून दुर्दैवी अंत झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत घोषित केलीय. सात जणांचा बुडून मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

कुठे घडली घटना?

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील पनरुट्टीजवळ असलेल्या किलारुंगुनाम या गावात ही दुर्दैवी घटना घडली. सात जणाांचा बुडून मृत्यू झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. या भागात असलेल्या गेडीलाम नदीत ही दुर्दैवी घटना घडली.

पाच लाखांची मदत

दरम्यान, या घटनेनं राज्यपाल आरएन रवी यांनीही खेद व्यक्त केलाय. मृतांच्या नातेवाईकांना ईश्वर या कठीण प्रसंगातून लढण्याचं बळ देवो, अशी प्रार्थनना त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीनं पाच लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री पब्लिक रिलिफ फंडातून ही मदत देण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पाहा महाराष्ट्रातील पावसाची बातमी :

काळजी घ्या! प्रशासनाला निर्देश

या घटनेनंतर आता प्रशासनाला उपाययोजना करण्याचेही निर्देश जारी करण्यात आले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी सूचना फलक आणि सतर्कता बाळगण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.