आधी आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार, वेदनेने रडत होती म्हणून गळा दाबला, वाचा नेमकं काय घडले?
घटनेच्या चार दिवस आधी जैबान, मुकेश आणि मनिष यांनी रविवारी दारू पिऊन मुलीवर बलात्कार करण्याचा कट रचला होता. कारण त्या दिवशी जास्त मजूर कामावर नसतात.
कर्नाटक : एका आठ वर्षाच्या बालिकेवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घृणास्पद घटना मंगळुरुमध्ये उघडकीस आली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जैबान(21), मुकेश सिंग(20), मुनीम सिंग(20), मनिष तिर्की(33) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पीडित मुलीचे कुटुंब मूळचे झारखंड येथील असून मंगळुरुमध्ये कामानिमित्त वास्तव्य करीत आहेत. पीडित मुलीचे आई-वडिल आणि आरोपी एकाच कारखान्यात मजूर म्हणून काम करीत होते.
चार दिवसापूर्वी आखली बलात्काराची योजना
पोलिसांच्या माहितीनुसार, मनिष तिर्की हा 11 महिन्यांपासून टाइल्स कारखान्यात काम करत होता, तर जैबन आणि मुकेश हे तीन महिन्यांपूर्वी रुजू झाले होते. तर मुनीम सिंग हा पुत्तूर येथे मजुरीचे काम करत होता आणि घटनेच्या दिवशी मनिषला भेटायला आला होता. घटनेच्या चार दिवस आधी जैबान, मुकेश आणि मनिष यांनी रविवारी दारू पिऊन मुलीवर बलात्कार करण्याचा कट रचला होता. कारण त्या दिवशी जास्त मजूर कामावर नसतात. पोलिसांनी सांगितले की, मुनीम शनिवारी आपल्या मित्रांना भेटण्यासाठी पुत्तूर येथे पोहोचला तेव्हा त्याने सांगितले की, मलाही या कटात सामील व्हायचे आहे.
बलात्कारानंतर गळा दाबून हत्या
रविवारी दुपारी 1.10 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या भावासोबत फॅक्टरी कॉम्प्लेक्समध्ये खेळत होती. यावेळी जैबानने तिचे अपहरण केले आणि तिला त्याच्या खोलीत नेले. त्यानंतर आरोपीने मुलीचे लैंगिक शोषण केले. यादरम्यान पीडिता वेदनेने सतत रडत होती, यामुळे जैबानने तिचा गळा दाबून खून केला. त्यांनी पीडितेचा मृतदेह नाल्यात फेकल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर मुकेश आणि मुनीम पुत्तूर हे दोघे पळून गेले. दुपारी 3 वाजता पीडितेच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, जैबान आणि मनीष हेही त्यांना काही माहीत नसल्याप्रमाणे शोधात सहभागी झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळून आल्याने मंगळुरू ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली.
आरोपींवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलमांनुसार आणि आयपीसीच्या कलम 376 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) विश्लेषण आणि घटनेशी संबंधित साक्षीदारांकडून माहिती मिळवण्यास पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती हर पोलीस आयुक्त एन शशी कुमार यांनी सांगितले.
टाईल्स कारखान्याच्या मालकाने हा कारखाना भाडेतत्वावर दिला आहे. कारखान्यात 41 लोक काम करतात. यामध्ये 6 मुलं आणि अन्य राज्यातील 21 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये मुख्यत्वे मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील मजुरांचा समावेश आहे. घटनेच्या दिवशी कारखान्यात 19 व्यक्ती काम करीत होते. यापैकी बऱ्याच लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (8-year-old girl raped and murdered in Karnataka)
इतर बातम्या
PARAMBIR SINGH : फरार घोषित परमबीर सिंह चंदीगडमध्ये, चौकशीला हजर राहणार-परमबीर सिंह
SACHIN VAZE : सचिन वाझेची उलटतपासणी, अनिल देशमुखांबद्दल वाझे म्हणाला…