Crime : 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर, घरच्यांनी मोबाईल चेक केल्यावर समोर आलं सत्य, उल्हासनगरमध्ये खळबळ

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. बदलापूर घटनेनंतर अनेक घटना समोर येत आहेत. अशातच उल्हासनगर येथून एक अशाच प्रकारची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime : 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर, घरच्यांनी मोबाईल चेक केल्यावर समोर आलं सत्य, उल्हासनगरमध्ये खळबळ
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 4:18 PM

राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असलेल्या पाहायला मिळत आहेत. बदलापूर घटनेनंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे राज्यातील जनतेचा रोष वाढलेला असताना ठाणे जिल्ह्यातीस उल्हासनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर ओळख 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला महागात पडलीय. इन्स्टग्रामवर झालेली ओळख त्यानंतर आरोपीने पीडितेसोबत असं काही केलं की सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

सोशल मीडियावर ओळख त्यानंतर मैत्री प्रेम आणि धोका अशी प्रकरणे आपण पाहिली असतील. उल्हासनगरमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीलाही इन्स्टावरची मैत्री महागात पडली. इंस्टाग्रामवर अल्पवयीन तरूणीची एका 22 वर्षीय तरूणीसोबत ओळख झाली होती. दोघेही सुरूवातील चॅटवर बोलू लागले. काही दिवसांमध्ये दोघांची चांगली मैत्री झाली. मुलीचा विश्वास तरूणाने जिंकला आणि त्यानंतर समोरासमोर भेटण्याचं दोघांचे ठरले. अल्पवयीन मुलगी त्याला भेटायला गेली त्यावेळी आरोपी तरूणाने तिला लग्नाचे आमीष दाखवले. लग्नाचे आमीष दाखवत गोड बोलून त्याने या भेटीवेळी तिच्यावर अत्याचार केला.

काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखू लागलं. सुरूवातीला दुखत असेल म्हणून जास्त लक्ष दिलं नाही. पण सतत पोट दुखू लागल्याने तिच्या पालकांनी तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. या प्रकरणाची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी तरूणाचा शोध घेत आहेत.

दरम्यान, दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या पाल्याबाबतीत सतर्कता दाखवायला हवी. कारण सोशल मीडियाचा वापर करताना मुले नको त्या गोष्टींच्या आहारी जाताना दिसत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांना चागंले-वाईट याबद्दल सांगायलं हवे. एकदा घटना घडून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय हातात काही राहत नाही. त्यामुळे आधीच काळजी घेतलेली बरी. पोलिसही पालकांना याबद्दल सतर्क राहायला सांगतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.