जुना वाद पुन्हा उफाळून आला, मित्रासोबत बसला असतानाच तरुणाचा काटा काढला !

पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने नागपूर हादरले आहे. हत्यासत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. काही ना काही कारणातून हत्यााकांडाच्या घटना घडत आहेत.

जुना वाद पुन्हा उफाळून आला, मित्रासोबत बसला असतानाच तरुणाचा काटा काढला !
जुन्या वादातून व्यक्तीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 5:16 PM

नागपूर : उपराजधानीत हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. रोज या ना त्या कारणातून हत्येच्या घटना घडत आहेत. क्षुल्लक कारणातून नात्यांचाही विसर पडलेला दिसतो. आज पुन्हा एका हत्याकांडाने नागपूर हादरले आहे. जुन्या वादातून 20 तरुणाने 40 वर्षाच्या इसमाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरमधील यशोधरा नगरमध्ये घडली आहे. भारत उके असे मयत व्यक्तीचे नाव आहे, रुपेश गडकरी असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जुना वाद उफाळून आला अन्…

नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत पिवळी नदी परिसरात भारत आणि रुपेश राहतात. दोघेही खाजगी कंपनीत काम करत होते. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी काही कारणातून वाद झाला होता. मयत भारत हा काल रात्री आपल्या मित्रासोबत परिसरात बसला होता. यावेळी आरोपी रुपेश तेथे आला. रुपेशने काही कळायच्या आत भारतवर चाकूने हल्ला केला. यात भारतचा जागीच मृत्यू झाला. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वच हादरुन गेले.

पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु

घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतेदह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर काही तासाच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद होता, याबाबत पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. चौकशीअंतीच सर्व सत्य उघड होईल.

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.