सहा महिन्यांपूर्वीच लग्न, काकाच्या तेराव्याच्या दुसऱ्याच दिवशी बँक उपव्यवस्थापकाचा मृत्यू

अपघातात जखमी सुमित रस्त्यात विव्हळत पडला होता. मात्र त्याची मदत करण्याऐवजी लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

सहा महिन्यांपूर्वीच लग्न, काकाच्या तेराव्याच्या दुसऱ्याच दिवशी बँक उपव्यवस्थापकाचा मृत्यू
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 5:14 PM

भागलपूर : बँकेच्या फिल्ड वर्कसाठी चाललेल्या उपव्यवस्थापकाला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये उघडकीस आली आहे. सुमित यादव असे मयत बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. एनएच 31 टोल प्लाझाजवळ ही थरारक घटना घडली आहे. अपघातात जखमी सुमित रस्त्यात विव्हळत पडला होता. मात्र त्याची मदत करण्याऐवजी लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

अपघातात काही लोक जखमी

या घटनेत अन्य काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर नवगछिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही लोकांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

आयकार्डवरील नंबरवर कॉल करुन कुटुंबीयांना कळवले

जखमी सुमितच्या गळ्यातील आयडी कार्डवरील नंबर घेऊन एका व्यक्तीने त्याच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत सुमितला नवगछिया अनुमंडल रुग्णालयात नेण्यात आले.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयात उपचारादरम्यान सुमितचा मृत्यू

मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात रेफर केले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, आधी सुमितची बाईक ई-रिक्षाला धडकली. त्यानंतर बाईक अनियंत्रित झाली आणि समोरुन येणाऱ्या ट्रकने बाईकला चिरडले.

सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

मयत सुमित यादवचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. एका राष्ट्रीयकृत बँकेत तो उपव्यवस्थापक म्हणून काम करत होता. तेरा दिवसापूर्वीच त्याच्या काकाचे निधन झाले होते. काकाच्या निधनानंतर काही दिवसातच तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.