मुलगा अचानक बेपत्ता झाला, घरच्यांनी शोधाशोध केली असता थेट…

दहा वर्षाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळायला गेला होता. संध्याकाळपर्यंत मुलगा परतला नाही. घरच्यांनी सगळीकडे शोध घेतला मात्र कुठेच सापडत नव्हता. मग जे सत्य समोर आले त्यानंतर आई-वडिलांना धक्काच बसला.

मुलगा अचानक बेपत्ता झाला, घरच्यांनी शोधाशोध केली असता थेट...
चाकणमध्ये 10 वर्षाचा मुलगा बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 6:42 PM

पुणे / रणजित जाधव : पुण्यातील चाकण तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रांसोबत खेळायला गेलेला 10 वर्षाचा मुलगा संध्याकापर्यंत घरी परतलाच नाही. मग घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. मात्र तो कुठेही सापडला नाही. मग घरच्यांनी महाळुंगे पोलिसांकडे मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी मुलगा कोणासोबत खेळत होता याची चौकशी केली. मुलासोबत खेळत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. खाणीत पोहायला गेला असता मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुलगा मित्रांसोबत खाणीत पोहायला गेला होता

मुलाच्या मित्रांनी सर्व मित्र खाणीत पोहायला गेल्याची कबुली पोलिसांकडे दिली. पोलिसांनी तात्काळ खाणीच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं असता पाण्याबाहेर मुलाचे कपडे आढळले. यावरुन मुलगा पाण्यात बुडाल्याचं स्पष्ट झालं. पाण्यात त्याचा शोध घेण्यासाठी मावळच्या वन्यजीव रक्षक बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. या पथकाने पाण्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला.

पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा बुडाला

मुलगा आपल्या मित्रांसोबत खाणीत पोहायला गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्र बुडालेला पाहून मित्र घाबरले अन् ते आपापल्या घरी परतले. घरचे ओरडतील म्हणून त्यांनी याबाबत कोणालाच कळू दिलं नाही. मुलगा बेपत्ता झाला म्हणून घरच्यांनी पोलीस तक्रार दिली असता सर्व प्रकार उघडकीस आला. मुलाच्या मृत्यूची बाब समोर येताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांवक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.