Delhi Murder & Suicide : दिल्लीत पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या, दोन मुलगे सुरक्षित
इसरार अमहद नामक व्यावसायिकाने पत्नी आणि मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याचे कळले. मात्र इसरारने दोन्ही मुलांना काहीही केले नाही.
दिल्ली : दिल्लीतील जाफराबाद भागात दोन मुली आणि पत्नीची हत्या (Murder) करुन व्यावसायिकाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इसरार अहमद असे या व्यावसायिका (Businessman)चे नाव आहे. इसरारने आधी पत्नी आणि दोन मुलींवर गोळ्या झाडल्या. मग स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. विशेष म्हणजे यावेळी इसरारचे दोन मुलगेही घराबाहेर उपस्थित होते. मात्र त्यांना काहीही केले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात हत्या आणि आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. इसरारने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास करीत आहेत. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने पोलीसही याबाबत उघडपणे काहीही बोलणे टाळत आहेत.
हत्या आणि आत्महत्येचे कारण अनभिज्ञ
जाफराबाद परिसरात शुक्रवारी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत प्राथमिक तपासात हत्या आणि आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले. इसरार अमहद नामक व्यावसायिकाने पत्नी आणि मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याचे कळले. मात्र इसरारने दोन्ही मुलांना काहीही केले नाही. केवळ पत्नी आणि मुलींनाच का मारले याबाबतही पोलीस तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याआधीही दिल्लीत अशा घटना घडल्या आहेत, ज्यात कुटुंबातील सदस्याने आपल्या इतर नातेवाईकांची हत्या केली आहे. मात्र आता जाफराबादच्या बाबतीत हे कोणत्या कारणासाठी करण्यात आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गेल्या दोन दिवसातील दुसरी मोठी घटना
दोन दिवसातील राजधानीतील दुसरी मोठी घटना घडली आहे. गुरुवारी मोडन गढी भागातील एका सरकारी शाळेत चाकूने वार केल्याची घटना घडली होती. ब्रेकच्या वेळेत मोहित नावाच्या विद्यार्थ्याचे त्याच्या इतर वर्गमित्राशी काही वादातून भांडण झाले. सुरुवातीला हे भांडण केवळ हाणामारीपुरते मर्यादित होते, मात्र नंतर रागाच्या भरात मोहितने साथीदारावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तीन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. (A businessman committed suicide by killing his wife and two daughters in Delhi)