आधी धडक दिली, नंतर कारच्या टपावर मृतदेह घेऊन संपूर्ण शहर फिरले; Video पाहून सर्वच हादरले
राजधानीत एका कारने दुचाकीवरून आलेल्या दोन भावांना धडक दिली. ज्यामध्ये एक तरूण कारच्या टपावर पडला. तरीही चालकाने कार न थांबवता तशीच पुढे नेली.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केजी मार्ग-टॉलस्टॉय मार्गाजवळ एका कारने बाईकवरून आलेल्या दोन तरुणांना धडक (car hit a bike) दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की दुचाकीवर बसलेला एक जण दूरवर रस्त्यावर पडला, तर दुसरा मुलगा कारच्या छतावर (man fell on car roof) पडला. कहर म्हणजे धडक दिल्यानंतर, तो तरूण आपल्याच कारच्या टपावर पडलाय हे माहीत असूनही चालकाने कार थांबवली नाही उलट तो वाहन चालवतच राहिला.
या अपघातास जबाबदार ठरलेले आरोपी 3 किलोमीटरपर्यंत वेगाने कार चालवत राहिले, त्यानंतर दिल्ली गेटजवळ आल्यानंतर आरोपींनी छताला लटकलेल्या मुलाला खाली फेकले आणि तेथून पळ काढला. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे. घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी मोहम्मद बिलाल यांनी ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. मोहम्मदने आपल्या स्कूटीने गाडीचा सतत पाठलाग केला आणि हॉर्न वाजवून आरडाओरडा केला पण आरोपीने काही गाडी थांबवली नाही. दीपांशी वर्मा ( वय 30) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे.
आई-वडिलांनी गमावला एकुलता एक मुलगा
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ज्या बाईकशी टक्कर झाली ते दोघे दुचाकीस्वारभाऊ होते. यामध्ये मोठा भाऊ दिपांशू वर्मा (30) यांचा मृत्यू झाला, तर त्याच्या मावशीचा मुलगा मुकुल (20) याची प्रकृती चिंताजनक आहे. दीपांशूचे दागिन्यांचे दुकान होते आणि तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने कार चालवत बाईकला धडक देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
ही संपूर्ण घटना मोहम्मद बिलाल यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिली आहे. बिलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर तो तरूण गाडीच्या टपावर पडला, हे माहीत असूनही त्या चालकाने कार थांहबवली नाही. हे पाहून बिलाल यांनी त्या कारचा पाठलाग केला व संपूर्ण घटना त्यांच्या कॅमेऱ्यातही कॅप्चर केली. बिलाला यांनी वारंवार हॉर्न वाजवून कार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कारचालक काही थांबला नाहीच. अखेर तीन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आरोपीने दिपांशूचा मृतदेह इंडिया गेटजवळ फेकला व त्याने तिथून पळ काढला.
व्हिडीओ पाहून सर्व हादरले
#WATCH | Man Dies In Delhi Hit-And-Run, Seen Lying On Roof As Car Driven For 3 Km
Following a car hit a motorcycle one of the men on a motorcycle was thrown several feet away, while the other landed on the roof of the car
Incident took place at the intersection of Kasturba… pic.twitter.com/7ta267NDjT
— Subodh Kumar (@kumarsubodh_) May 3, 2023
हिट अँड रनची ही पहिलीच घटना नसून दिल्लीत रोज असे प्रकार समोर येत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला कांजवाला भागातही एका कारस्वाराने स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला धडक दिली होती, त्यामुळे ती गाडीच्या चाकात अडकली आणि कारस्वार तरुणीला अनेक किलोमीटर रस्त्यावर ओढत राहिले. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी, अलीकडेच एका कारचालकाने एका व्यक्तीला गाडीच्या बोनेटवर झोपवून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत नेले. तो माणूस गाडी थांबवण्याची विनवणी करत होता, पण चालकाने वाहन थांबवले नाही.