विमानतळावर चेकिंग दरम्यान म्हणाली ‘बॅगेत बॉम्ब आहे’; सामानाची तपासणी केली तर…

मुंबई कोलकाता विमानाने एक महिला कोलकात्याला चालली होती. चेकिंग दरम्यान महिलेने अचानक आपल्या सामानात बॉम्ब असल्याचे सांगितले अन् एकच खळबळ उडाली.

विमानतळावर चेकिंग दरम्यान म्हणाली 'बॅगेत बॉम्ब आहे'; सामानाची तपासणी केली तर...
मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह एकाला अटकImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 9:37 AM

मुंबई : मुंबई विमानतळावर एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केला. यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी स्निपर डॉगच्या मदतीने सामानाची तपासणी केली असता महिलेचा खोटेपणा उघड झाला. सहार पोलिसांनी खोटी बॉम्बची भीती निर्माण केल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. महिलेने हे कृत्य करण्याचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. सदर महिलेला कोलकात्याला जायचे होते. यासाठी मुंबई-कोलकाता विमानाने प्रवास करणार होती. मात्र विमानतळावर चेकिंग दरम्यान तिने नको ते कृत्य केले अन् ते तिच्याशी अंगाशी आले.

काय आहे प्रकरण?

सदर महिला मुंबई-कोलकाता विमानाने कोलकात्याला चालली होती. महिलेकडे अतिरिक्त सामान होते. यामुळे विमानतळावर चेकिंग दरम्यान तिला अतिरिक्त सामानाचे पैसे भरण्यास सांगितले. महिलेकडे दोन बॅगा होत्या, ज्या तिने एअरलाइन कर्मचाऱ्याला चेक-इनसाठी दिल्या होत्या. या विमान कंपनीच्या नियमांनुसार, देशांतर्गत प्रवाशांना फक्त एकच बॅग नेण्याची परवानगी आहे. तसेच या बॅगेचे वजन 15 किलोपेक्षा जास्त नसावे.

अतिरिक्त सामानाचे पैसे भरण्यास सांगितले म्हणून महिलेचे कृत्य

महिलेने फ्लाईटच्या एअरलाईन कर्मचाऱ्याकडे बोर्डिंग पासची मागणी केली असता कर्मचाऱ्याने पैसे भरण्यास सांगितले. मात्र महिलेने पैसे भरण्यास नकार देत वाद घालण्यास सुरवात केली. यानंतर कर्तव्यावर असणारे या विमान कंपनीचे ग्राहक सेवा कार्यकारी (CSE) डी ए वाडकर हे विमान कंपनीच्या नियमांची माहिती देण्याचा प्रयत्न करत असताना अचानक महिलेने तिच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केला.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) अधिकार्‍यांनी महिलेच्या बॅगेची तपासणी करण्यासाठी स्निफर कुत्र्यांना पाचारण केले. मात्र, बॅगेत काहीही सापडले नाही आणि तिचा दावा खोटा ठरला. यानंतर वाडकर यांच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 336 (जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) आणि 505 (2) (सार्वजनिक उपद्रव घडवून आणणारी विधाने) अंतर्गत तिच्याविरुद्ध पोलीस खटला दाखल करण्यात आला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.