त्याने तिला बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याची कबुली दिली, आता खूनाचा गुन्हा दाखल होणार

बँड स्टँडच्या समुद्र किनाऱ्यावरून नोव्हेंबर 2021 मध्ये बेपत्ता झालेल्या पालघरच्या रहिवासी आणि मेडीकलची विद्यार्थीनी हीची हत्या करून तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याचे लाईफगार्डने अखेर कबूल केले आहे.

त्याने तिला बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याची कबुली दिली, आता खूनाचा गुन्हा दाखल होणार
saneImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 11:07 AM

मुंबई : बँड स्टँडच्या समुद्र किनाऱ्यावरून नोव्हेंबर २०२१ मध्ये बेपत्ता झालेली जे.जे.ची मेडीकल स्टुडन्टची अखेर हत्या केल्याची कबूली त्या मध्यरात्री तिच्या सोबत सेल्फी काढलेल्या लाईफ गार्डने पोलीसांना दिली आहे. आपण तिची हत्या करून तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याचे लाईफ गार्ड मिथू सिंग याने पोलीसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा साने हिची हत्या केल्याचे बँडस्टँडचा लाईफ गार्ड मिथू सिंह याने पोलीसांकडे कबूल केले आहे. हत्येनंतर आपण तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याचेही त्याने पोलीस चौकशीत सांगितले. मात्र हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. कदाचित आता या प्रकरणात कोर्टात दाखल होणाऱ्या आरोपपत्रातच याचा खुलासा होईल असे म्हटले जात आहे. दरम्यान, या प्रकरणात मिथू सिंग अपहरणासह आता खूनाचा आयपीसी कलम 302 अंतर्गत खूनाचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.

पालघरची रहिवासी असलेली सदिच्छा ही मुंबईतील जे. जे. ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली, ती पुन्हा घरात परतलीच नाही. तिचा शोध लागत नसल्याने कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात तिच्या हरविल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

या तरुणीचा शोध घेण्यासाठी बॅण्ड स्टॅण्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरातील सीसीटीव्हींचा तपास केला असता लाईफ गार्डचे प्रकरण समोर आले होते. तो त्या रात्री तिला भेटलेला अखेरचा दूवा पोलीसांसमोर होता. मात्र त्याने अनेकदा प्रयत्न करूनही गुन्हा नाकारत आपण तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. तिला समुद्रात खोलवर जाऊ नको असे सांगितले. त्यानंतर तिने आपण आत्महत्या करीत नसल्याचे सांगितले, त्याच्या मोबाईलवर तिच्या सोबतचे सेल्फी देखील होते.

त्यानंतर ती कुठे गेली आपल्याला ठावूक नसल्याचे पालपूद त्याने पोलीस चौकशीत कायम ठेवले होते. त्यानंतर त्याची नार्को चाचणीही करण्यात आली. अखेर त्याला गेल्या आठवड्यात सुरूवातीला अपहरणाच्या गुन्ह्यात मिथू सिंग याला अटक करण्यात झाली. बँड स्टँडहून परताना एकाही सीसीटीव्हीत तिचा थांगपत्ता लागत असल्याने येथेच तिचे काही बरेवाईट झाले असावे असा पोलीसांना संशय होताच. अखेर पोलीसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपी लाईफगार्डने सत्य ओकत तिची हत्या केल्याचे कबूल केले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.