आवडती मुलगी आपल्याशी न बोलता इतर मुलांशी बोलत होती, नैराश्येतून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

बीकॉमच्या प्रथम सत्राची सध्या परीक्षा सुरू आहे. वर्ग खोलीत विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना हा विद्यार्थी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

आवडती मुलगी आपल्याशी न बोलता इतर मुलांशी बोलत होती, नैराश्येतून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
बुलढाण्यात एकतर्फी प्रेमातून विद्यार्थ्याने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 10:01 PM

बुलढाणा : आपली आवडती मुलगी आपल्याशी न बोलता इतर मुलांशी बोलत असल्याने एका महाविद्यालयीन तरुणाने नैराश्येतून जीवन संपवल्याची घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. महाविद्यालयातील एका वर्ग खोलीतच विद्यार्थ्याने जीवन संपवल्याने खळबळ माजली आहे. सूरज गावंडे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सूरज बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत होता. महाविद्यालयात वर्ग खोलीत परीक्षा क्रमांक टाकण्याचे काम सुरु होते. यावेळी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सूरजचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी जळगाव जालोद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील घटना

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात ही घटना घडली. काल बीकॉम प्रथम वर्षाचा अकाउंट या विषयाचा पेपर होता. पेपर सुरू होण्याआधीच या विद्यार्थ्यांना एका वर्ग खोलीत आत्महत्या केली आहे.

वर्गात परीक्षा क्रमांक टाकत असताना घटना उघडकीस

बीकॉमच्या प्रथम सत्राची सध्या परीक्षा सुरू आहे. वर्ग खोलीत विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना हा विद्यार्थी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

खिशात चिट्ठी सापडली

तात्काळ घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता खिशात एक चिट्ठी सापडली.

काय लिहलंय चिट्ठीत?

या चिट्ठीत ‘एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलत होती’ अशा आशयाची माहिती लिहिलेली आहे. विशेष म्हणजे त्याने एका रजिस्टरमध्ये आणखी तीन मुलांची नावे देखील लिहिलेली असल्याने सूरजने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केली असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.

याप्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र अजूनही कोणतीच कारवाई नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.