धुळवड खेळून रंग धुण्यासाठी नदीवर गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला

राज्यासह देशभरात आज धुळवड उत्साहात साजरी झाली. मात्र पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात या धुळवडीच्या सणाला गालबोट लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

धुळवड खेळून रंग धुण्यासाठी नदीवर गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला
इंद्रायणीत नदीत तरुण बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 5:38 PM

मावळ, पुणे / रणजित जाधव : धुळवड खेळून झाल्यावर मित्रांसोबत रंग धुण्यासाठी नदीवर गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाची ही धुळवड अखेरचीच ठरली. नदीवर गेलेले काही तरुण इंद्रायणीत नदीत उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि तरुण बुडाला. पुण्यातील मावळमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुण मूळचा जळगाव जिल्ह्यातील तारखेड गावातील रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो पुण्यात राहत होता.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी वराळेमधील डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालयात शिकत आहेत. या घटनेमुळे पुण्यासह जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

धुळवडीचे रंग धुण्यासाठी नदीवर गेले होते तरुण

डी.वाय. पाटील महाविद्यालयातील सात ते आठ जणांचा ग्रुप धुळवड खेळत होता. धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी मावळमधील वराळे गावामधील इंद्रायणी नदी परिसरात सर्वजण गेले होते. यावेळी मयत जयदीप आणि त्याचे काही मित्र रंग धुण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने जयदीप पाटील याचा नदीत बुडून मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

तळेगाव एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद

घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि मावळमधील वन्यजीव रक्षक संस्थेतील स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. मावळमधील वन्यजीव रक्षक संस्थेतील स्वयंसेवकांनी नदीतून मृतदेह बाहेर काढला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करत आकस्मात मृत्यू नोंद करत, शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.