आठ महिने महिलेच्या अंतर्वस्त्रांची होत होती चोरी, पण शेवटी झालं असं की दहा जणांची डोकी फुटली
महिलेच्या अंतर्वस्त्रांची चोरी होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ महिन्यानंतर सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठा वाद झाला. इतकंच काय तर दहा जणांची डोकी फुटली.
अहमदाबाद : अहमदाबादमधील धंधुका जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गावात महिलेल्या अंतर्वस्त्रांची चोरी होत होती. गेल्या आठ महिन्यांपासून सदर प्रकार घडत होता. महिला आपली अंतर्वस्त्र सुकवण्यासाठी बाहेर दोरीवर टाकायची. त्यानंतर अंतर्वस्त्र तेथून गायब व्हायची. यामुळे महिला पुरती हैराण झाली होती. 27 जून रोजी महिलेने गेल्या आठ महिनांपासून होत असलेला प्रकार उघडकीस आणण्यासाठी पाळत ठेवली. नेहमीप्रमाणे आपली अंतर्वस्त्र सुकवण्यासाठी दोरीवर टाकली आणि नजर ठेवली. तेव्हा तिला या चोरीचा उलगडा झाला आणि दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दहा जण जखमी झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात झालेल्या वादाप्रकरणी 20 जणांना ताब्यात घेतलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, “अंतर्वस्त्राची चोरी होत असल्याने महिला पुरती हैराण झाली होती. त्यानंतर तिने चोराला पकडण्याचा निर्धार केला. महिलेने आपल्या सेलफोनचा कॅमेरा ऑन करून त्या ठिकाणी लपवून ठेवला. चोर जेव्हा अंतर्वस्त्र चोरी करण्यास आला तेव्हा ती घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली. इतकंच आक्षेपार्ह कृत्यही मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं.”
महिलेने 26 जून रोजी सदर फुटेज तपासल्यानंतर तिला धक्काच बसला. चोर दुसरा तिसरा कोणी तिचा शेजारीच असल्याचं समोर आलं. पुढच्या दिवशी त्याच्या पाळत ठेवली असता त्याल अंतर्वस्त्र चोरताना बघितलं. त्याचा पाठलाग केला आणि चोरलेल्या अंतर्वस्त्रांचा छडा लागला. तसेच शेजाऱ्याला सदर महिलेने जाब विचारला असता आरोपीने महिलेला मारहाण केली.
महिलेने आरडाओरड केल्यांतर घरातील सदस्य लाठ्याकाठ्या घेऊन सदर ठिकाणी आले. त्यांनी आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांवर हल्लाबोल केला. त्यानंतर आरोपीच्या घरच्यांनी महिलेल्या कुटुंबियांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेलं.
धंधुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पीएन जिंजुवाडिया यांनी सांगितलं की, ‘हाणामारीत जवळपास 10 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाच्या 20 जणांना अटक केली आहे. महिलेल्या कुटुंबियांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करणयात आला आहे. तर आरोपीच्या कुटुंबियांवर छेडछाड आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’