AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघेही जिवलग मित्र, पण मित्राची ती गोष्ट खटकली अन् घडू नये ते घडलं !

दोघेही जिवलग मित्र होते. पण एक गोष्ट त्याच्या मैत्रीत बाधा बनली अन् त्या दोघांची मैत्री कायमची तुटली. दोघा जीवलग मित्रांमध्ये जे घडलं ते सर्वांना धक्का देणारं होतं.

दोघेही जिवलग मित्र, पण मित्राची ती गोष्ट खटकली अन् घडू नये ते घडलं !
जुन्या वादातून मित्राने मित्राला संपवले
| Updated on: May 15, 2023 | 10:07 PM
Share

नोएडा : जगात मैत्रीसारखं जवळचं नातं नाही. मित्र हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक असतो. पण नोएडात या मैत्रीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मित्राने आपल्या जीवलग मित्रावर खोटा आरोप केला. हा आरोप मित्राच्या जिव्हारी लागला आणि त्याने आपल्या मित्राचाच काटा काढल्याची घटना नोएडात घडली आहे. पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. रोहित असे आरोपी मित्राचे नाव आहे, तर शिवम असे मयत मित्राचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शिवमने रोहितवर चोरीचा आरोप केला होता

रोहित आणि शिवम दोघेही चांगले मित्र होते. दोघेही भंगेल गावात राहत होते आणि नेहमी सोबत असायचे. शिवम मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील रहिवासी होता. काही महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. यानंतर तो पत्नीसह भंगेल गावात रहायला आला होता. रविवारी रात्री तो रोहितला भेटायला गेला होता. यावेळी शिवमने रोहितवर पैसे चोरल्याचा आरोप केला. रोहितला मित्राच्या या आरोपामुळे खूप वाईट वाटले.

सर्वांसमोर अपमान केल्याने रोहितने शिवमला संपवले

शिवमच्या आरोपामुळे रोहितला सर्वांसमोर अपमानास्पद वाटले. यामुळे तो संतापला होता. संतापाच्या भरात राजूने शिवमवर जीवघेणा हल्ला केला. यात शिवमचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेताल. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तपासादरम्यान पोलिसांना मित्रानेच शिवमची हत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, पुढील तपास करत सुरु आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.