पत्नीकडे वाईट नजरेने पहायचा मित्र, एके दिवशी घरी बोलावले मग…

पतीचा मित्र छेड काढायचा आणि शारिरीक संबंध ठेवण्यास दबाव टाकायचा. अखेर महिलेने ही बाब आपल्या पतीला सांगितली. यानंतर पतीला अनावर झाला. मग जे घडले ते भयंकर.

पत्नीकडे वाईट नजरेने पहायचा मित्र, एके दिवशी घरी बोलावले मग...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 4:12 PM

अहमदाबाद : पत्नीकडे वाईट नजरेने बघायचा म्हणून पतीने पत्नीच्या मदतीने मित्राचा काटा काढल्याची घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याचे तलवारीने 9 तुकडे केले आणि कालव्यात फेकले. पोलिसांनी आरोपी जोडप्याला अटक केली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतदेहाचे 8 तुकडे हस्तगत केले आहेत. पोलीस अद्याप मृतदेहाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली तलवारही जप्त केली आहे. इम्रान आणि रिजवाना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पत्नीची छेड काढायचा म्हणून पतीने घडवली अद्दल

मेहराज पठाण असे मृत तरुणाचे नाव आहे. मेहराज हा याची मित्र इम्रानची पत्नी रिजवाना सुलतान हिच्यावर वाईट नजर ठेवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संधी मिळताच तो तिच्यासोबत फ्लर्ट करायचा आणि तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. अखेर रिजवानाने आपला पती इम्रानला याची माहिती दिली. यानंतर दोघांनी मिळून मेहराजला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

घरी बोलावले आणि हत्या केली

एके दिवशी इम्रानने मेहराजला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर सरप्राईझ देण्याच्या नावाखाली त्याच्या डोळ्यावर स्कार्फ बांधला. मग इम्रानने तलवारीने वार करुन हत्या केली. यानंतर दोघांनी मृतदेहाचे नऊ तुकडे करून मृतदेह कालव्यात फेकून दिले. दुसरीकडे मेहराज घरी परतला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. यानंतर पोलिसात मेहराज बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा

मेहराज इम्रानच्या घरी जात असल्याचे सांगत घरुन गेला असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली. चौकशीत पोलिसांना त्याच्यावर संशय आला म्हणून पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यानंतर त्याने गुन्हा मान्य करत सर्व हकीकत सांगितली.

पती-पत्नीला पोलिसांकडून अटक

ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघा पती-पत्नीला अटक करून तुरुंगात रवानगी केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत धडाचे आठ तुकडे जप्त करण्यात आले आहेत. आता डोक्याचा शोध सुरू आहे. कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाने तरुणाचे डोके वाहून गेले असावे, अशी भीती व्यक्त होत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.