AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज आहे सांगायचे, मग कारवाईच्या नावाखाली ‘अशी’ करायचे लुटायचे !

मुंबई पोलिसांच्या नावे फोन करुन कुरिअरच्या नावे फसवणूक करायचे. कुरिअरमध्ये ड्रग्ज असून, कारवाई टाळण्यासाठी पैशाची मागणी करायचे.

तुमच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज आहे सांगायचे, मग कारवाईच्या नावाखाली 'अशी' करायचे लुटायचे !
मुंबई पोलिसांच्या नावे फसवणूक करणारी टोळी अटकImage Credit source: TV9
| Updated on: May 02, 2023 | 8:03 PM
Share

गोविंद ठाकूर, मुंबई : मुंबई पोलिसांच्या नावे फेक काॅल करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील पाच जणांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा मास्टरमाइंड चीनमध्ये असून, ही टोळी भारतातील विविध राज्यात ऑनलाइन फसवणूक करतात. तुमच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज आहे सांगत कारवाई टाळण्यासाठी लोकांकडून पैसे घ्यायचे. मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, या आरोपींना कोलकाता, मुंबई आणि विशाखापट्टणम येथून अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस असल्याची बतावणी करायचे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीतील लोक व्हॉट्सअॅप आणि स्काईप अॅपच्या माध्यमातून बहुतांश महिलांना टार्गेट करायचे. अटक करण्यात आलेले आरोपी स्वतःला मुंबई पोलिसांचे अधिकारी म्हणवून घेत आणि त्यांना खात्री देण्यासाठी डुप्लिकेट पोलीस ओळखपत्र पाठवत असत. अनेक वेळा पोलिसांचा युनिफॉर्म घालून व्हिडीओ कॉलवर बोलत असत.

कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगितले

आरोपी फोन करून तुमच्या नावाच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडले आहेत, असे सांगायचे. मग कारवाईच्या नावाखाली त्यांना धमकावून त्यांचे बँक खाते आणि इतर तपशील घेऊन ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे. बँकेचा तपशील मिळाल्यानंतर 5 मिनिटांत संपूर्ण बँक खाते रिकामे करायचे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, हैदराबाद, सायबराबाद, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्ये अशा ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पाच आरोपींना अटक करण्यास यश

मुंबई पोलिसांच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे वाढते प्रकार पाहून मुंबई पोलीस या आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून त्यांचा शोध घेत होते. सुमारे दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या पाच आरोपींना अटक करण्यात बांगूर नगर पोलिसांना यश आले आहे. संजय नीळकंठ मंडळ, अनिमेश अजितकुमार वैद्य, महेंद्र अशोक रोकडे, मुकेश अशोक दिवे अशी अटक आरोपींची नावे आहेत. श्रीनिवास राव सुब्बाराव दाडी असे मुख्य आरोपीचे नाव असून, तो हैदराबादचा रहिवासी आहे.

पोलिसांनी त्याला विशाखापट्टणम येथील नोव्होटेल हॉटेलमधून अटक केली. पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपीने सांगितले की, त्याचा मास्टरमाइंड चीनमध्ये आहे आणि त्याच्या इशाऱ्यावर लोक भारतातील विविध राज्यांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने ऑनलाईन फसवणूक करतात.

यात मुख्य आरोपी श्रीनिवास सुब्बाराव दाडी याचा अल्पवयीन मुलगाही सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे, मात्र तो सध्या चीनमध्ये आहे. जे काही पैसे ट्रान्सफर करायचे ते मुख्य आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात असायचे. पोलिसांनी त्यांच्याकडून पॅनकार्ड, डेव्हिड कार्ड, ओळखपत्र, बँक पासबुक, लॅपटॉप, मोबाईल फोन, स्टॅम्प रबर असे अनेक साहित्य जप्त केले आहे. सध्या बांगूर नगर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचाही शोध घेत आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.