पाकिस्तानमध्ये 8 वर्षांच्या अल्पवयीन हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार! चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरु

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ही संतापजनक घटना घडली. 8 वर्षांची ही मुलगी 28 ऑगस्ट रोजी अत्यंत चिंताजनक अवस्थेत आढळून आली होती. सध्या या मुलीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित अल्पवयीन मुलीवर उमरकोट येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाकिस्तानमध्ये 8 वर्षांच्या अल्पवयीन हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार! चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरु
खेळायला गेलेली चिमुकली घरी परतलीच नाहीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 8:55 PM

भारतात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतानाच आता एक खळबळजनक घटना पाकिस्तानमधून (Pakistan Crime News) उघडकीस आलीय. पाकिस्तानमध्ये एका हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार (Rape case) करण्यात आलाय. या घटनेनं एकच संताप व्यक्त केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करण्यात आलेल्या पीडित हिंदू मुलीचं वय हे अवघं 8 वर्ष (Pakistan 8 year old girl rape case) असल्याची माहिती समोर आली आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलीच्या डोळ्यात नराधमाने चाकूही भोसकला होता. पीडित चिमुरडीच्या दोन्ही डोळ्यात चाकू भोसकण्यात आला होता. यामुळे मुलीच्या डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ही मुलगी गंभीररीत्या जखमी झालीय. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलीची सध्या मृत्यूशी झुंज सुरु असून ही मुलगी वाचवण्याशी शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जातंय.

नेमकी काय घडलं?

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ही संतापजनक घटना घडली. 8 वर्षांची ही मुलगी 28 ऑगस्ट रोजी अत्यंत चिंताजनक अवस्थेत आढळून आली होती. सध्या या मुलीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित अल्पवयीन मुलीवर उमरकोट येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. इतकंच नाही, तर तिच्या दोन्ही डोळ्यात नराधमांनी चाकूही भोसकला होता.

पीडितेची मृत्यूशी झुंज सुरु

जेव्हा या पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा या पीडितेच्या दोन्ही डोळ्यात मोठ्या प्रमाणात रक्त सांडलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक असून तिचा जीव वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. सिंध प्रांतात हिंदूंवर अत्याराच्या अनेक घटना याआधीही समोर आलेल्या आहेत. त्यात बलात्कार, हत्या, अपहरण यासारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार उघडकीस आलेले आहेत.

हे सुद्धा वाचा

काही महिन्यांपूर्वी एका 18 वर्षांच्या मुलीची सिंधमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती. तर दुसऱ्या एका घटनेत एका हिंदू मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आलेली होती. 1947 साली झालेल्या विभाजनानंतर सिंध प्रांत पाकिस्तानात गेला होता. या प्रांतात 13 टक्के हिंदू असल्याची अधिकृत आकडेवारी असल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र आता ही संख्या अवघी 1.5 टक्के इतकी झाली असल्याचंही सांगितलं जातं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.