कौटुंबिक वाद टोकाला गेला, संतापलेल्या पतीने पत्नीचा काटा काढला !

पती-पत्नीमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद व्हायचे. अखेर या वादातून पतीने टोकाचे पाऊल उचलले. यानंतर पतीची थेट तुरुंगात रवानगी झाली.

कौटुंबिक वाद टोकाला गेला, संतापलेल्या पतीने पत्नीचा काटा काढला !
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 5:22 PM

नवी मुंबई : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सीबीडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद होते, याबाबत अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अटक आरोपीविरुद्ध कलम 302 (हत्या) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे

सीबीडी बेलापूरमधील सेक्टर 4 मध्ये राहणाऱ्या कौर दाम्पत्यात नेहमी वाद व्हायचे. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे काही कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

आरोपीला अटक

पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तपासाअंतीच पती-पत्नीमधील वादाचे कारण स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.