हिजाब-बुरखा घातलेल्या महिलेचे चाकूनं सपासप वार, टॅक्सी चालकावर का केला हल्ला?

टॅक्सी ड्रायव्हरवर चाकून हल्ला करणारी ही महिला इजिप्तची असल्याचं बोललं जातंय. गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इजिप्तच्या मिस्र इथली राहणारी आहे.

हिजाब-बुरखा घातलेल्या महिलेचे चाकूनं सपासप वार, टॅक्सी चालकावर का केला हल्ला?
टॅक्सीचालकावर महिलेचा चाकूनं हल्ला
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 3:05 PM

हरियाणा : संपूर्ण देशात हिजाब विरुद्ध भगवा (Hijab vs saffron) असा वाद पेटलेला असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिजाब आणि बुराखा परिधान केलेल्या एका महिलेनं एका पुरुषावर चाकूनं वार केले आहेत. धारधार शस्त्रानं सपासप वार करणारी ही महिला भारतीय नसल्याचीही माहिती समोर आली आहे. परदेशी महिलेने एका टॅक्सी चालकावर धारदार चाकूनं (attacked on taxi driver by lady passenger) वार केलेत. ही घटना गुरुग्राममध्ये (Gurugram, Haryana) घडली आहे. यात हल्ल्यात जखमी झालेल्या टॅक्सी चालकाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनीही हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतलंय. आता पोलिसांकडून या महिलेची कसून चौकशी सुरु आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली. या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

परदेशी महिला नेमकी कुठची?

आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, टॅक्सी ड्रायव्हरवर चाकून हल्ला करणारी ही महिला इजिप्तची असल्याचं बोललं जातंय. गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इजिप्तच्या मिस्र इथली राहणारी आहे. या महिलेची सध्या चौकशी सुरु असून या महिलेनं नेमका टॅक्सी चालकावर हल्ला का केला, याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला टॅक्सी चालकासोबत गैरवर्तन करत असल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतरत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या टॅक्सीचालकावर हल्ला करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलंय. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या महिलेनं पोलिसांसोबतही गैरव्यवहार केल्याचं बोललं जातंय. पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई करताना या महिलेनं पोलिसांच्याही अंगावर पाणी फेकलं. अखेर धुडगूस घालणाऱ्या या महिलेला पोलिसांनी आपल्या गाडीत बसवलं आणि पोलिस स्थानकात आणलंय.

असं का केलं?

ज्या टॅक्सी ड्रायव्हरवर हल्ला करण्यात आला, त्याचं नाव रघुराज आहे. टॅक्सी चालवताना भाडं आलंय, असं समजून त्यानं एका महिलेला आपल्या गाडीत बसवलं. या महिलेला कुठं जायचंय, असं विचारलं असता, तिनं थेट चाकूनं वार केला, असा आरोप टॅक्सी चालक रघुराज यांनी केलाय. हल्लाखोर महिला कोण आहे, तिनं असं काय केलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, याप्रकरणी सध्या हरियाणा पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO | गँगस्टर छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट ईडीच्या ताब्यात, छापेमारीदरम्यान कारवाई

VIDEO | पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर सात गाड्यांचा विचित्र अपघात, दोन ट्रकमध्ये चिरडलेल्या कारमधील चौघे जागीच ठार

Lalu Yadav convicted : चारा घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अडचणी वाढल्या! लालू प्रसाद यादव दोषीच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.