मुलाला सतत वाटायचे आई आपल्यालर कमी प्रेम करते, मग नाराज अल्पवयीन मुलाने जे केले ते भयंकरच !

आई आपल्यावर कमी प्रेम करते असे सतत वाटत असल्याने नाराज झालेल्या अल्पवयीन मुलाने वडिलांच्या बंदुकीतून गोळी झाडत आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

मुलाला सतत वाटायचे आई आपल्यालर कमी प्रेम करते, मग नाराज अल्पवयीन मुलाने जे केले ते भयंकरच !
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 3:13 PM

टिकमगड : आई आणि मुलामधील नाते फार हळवे असते. त्यामुळे कधी आई रागावली किंवा निराश झाली तर आईचा तो रुसवा मुले फार गांभीर्याने मनावर घेतात. त्यातून मुले कधी कधी टोकाचा निर्णय घेतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर लहान मुलांचा चिडचिडपणा वाढला आहे. अशा परिस्थितीत मुलांचा संयम सुटत चालला आहे. त्यातून मुले आईच्या नाराजीनंतर भयंकर पावले उचलत आहेत. मध्य प्रदेशमध्ये उघडकीस आलेल्या घटनेने या धक्कादायक सत्याची प्रचिती आणून दिली आहे. आई आपल्यावर कमी प्रेम करते ही मनातील खदखद आणि दुःख असह्य झाल्यामुळे मुलाने चक्क आईची हत्या केली. वडिलांच्या परवाना असलेल्या बंदुकीतून आईवर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या मातेचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

केवळ आई कमी प्रेम करते म्हणून आईला दिलेली ही भयंकर शिक्षा पाहून सर्वच हादरून गेले आहेत. मुलांच्या मनावर सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांचा परिणाम झाला आहे. त्यातून मुलांना अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्याची कल्पना येऊ लागली आहे, असे मत या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणकारांनी आणि बाल मानसशास्त्र तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

काय घडले नेमके?

आई आपल्यावर कमी प्रेम करते असे सतत वाटत असल्याने नाराज झालेल्या अल्पवयीन मुलाने वडिलांच्या बंदुकीतून गोळी झाडत आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यातील भगतनगर गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे.

हे सुद्धा वाचा

आईची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली बंदुकही जप्त केली आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

आरोपीचे वडिल इलाहाबाद बँकेत सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. मुलाने वडिलांच्या परवानाधारक बंदुकीतून आईवर गोळी झाडली. पोलिसांनी बंदुकीसह दोन कडातूस जप्त केले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.