तिला आराम करु द्या डिस्टर्ब करु नका सांगितले, दोन दिवसांनी दरवाजा उघडताच सर्वांनाच धक्का बसला

हॉटेलच्या काउंटरवर त्यांनी आमची मैत्रीण रूममध्ये झोपली आहे, तिला डिस्टर्ब करू नका असा निरोप दिला. मात्र हॉटेलचा रूम उघडल्यानंतर धक्कादायक सत्य उघडकीस आले.

तिला आराम करु द्या डिस्टर्ब करु नका सांगितले, दोन दिवसांनी दरवाजा उघडताच सर्वांनाच धक्का बसला
हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळली तरुणीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 10:46 PM

जोधपूर : आजकाल मित्र-मैत्रिणींवरही विश्वास ठेवणे फार कठीण झाले आहे. कोण कधी आणि कुठे दगा देईल याचा भरवसा देता येणार नाही. मैत्रत्वातील विश्वास कधी जीवावर बेतेल, याचा नेम नसतो. नुकतीच उघडकीस आलेली एक धक्कादायक घटना मैत्रीवरचा विश्वास उडवत आहे. घटना राजस्थानच्या जोधपुरमधील आहे. हॉटेलच्या रूममध्ये एका मैत्रिणीची हत्या करून दोघे मित्र फरार झाले.

हॉटेलच्या काउंटरवर त्यांनी आमची मैत्रीण रूममध्ये झोपली आहे, तिला डिस्टर्ब करू नका असा निरोप दिला. मात्र हॉटेलचा रूम उघडल्यानंतर धक्कादायक सत्य उघडकीस आले. हॉटेलच्या रूममध्ये तरुणी फासावर लटकलेली आढळली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती तरुणी

मृतावस्थेत सापडलेली तरुणी ही नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. सुमन वैष्णोइ असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. दोन दिवसांपासून तिच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्यामुळे घरचे लोक काळजीत सापडले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने सुमन ही प्रशिक्षण घेत असलेल्या उमेद हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

घरच्यांनी मिसिंगची तक्रार दिली

मात्र तिथल्या नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातही तिचा ठावठिकाणा नव्हता. त्यानंतर शोधाशोध सुरू होऊन तिच्या बेपत्ता होण्याची पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. याचदरम्यान शहरातील सर्व हॉटेल्सची झाडाझडती घेण्यात आली.

हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळली तरुणी

यावेळी पावटा येथील एका हॉटेलच्या रूमचा दरवाजा दोन दिवसांपासून बंद असल्याचे उघडकीस आले. पोलिसांदेखत रूमचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा बेपत्ता सुमन ही त्या रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली.

पोलिसांनी त्या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. अधिक तपासादरम्यान हॉटेलच्या रूममधून दोन युवक दोन दिवसांपूर्वी येऊन गेले होते अशी माहिती पुढे आली. त्या आधारे पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध घेणे सुरू केले आहे.

प्रथमदर्शनी आत्महत्येचा संशय

पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनामानुसार तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हॉटेलच्या संचालकांनी दिलेल्या जबाबवरून तरुणीच्या मृत्यूमागे त्या दोन तरुणांचा हात आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.