एका प्रवाशाला गनपॉईंटवर पॅण्ट्रीकारपर्यंत नेऊन आरपीएफ जवान चेतन सिंगने गोळी घातली, कसाबची आठवण झाल्याचे साक्षीदाराने सांगितले
सोमवारी हा भयंकर प्रकार घडला त्यावेळी अटेडंड कृष्ण कुमार शुक्ल हे ट्रेनमध्ये हजर होते. त्यावेळी आरोपी चेतन सिंग ज्याप्रकारे आवेशाने गन घेऊन सज्ज होता ते पाहून दहशतवादी अजमल कसाबची आठवण झाल्याचे ते म्हणाले.
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आपल्या अत्याधुनिक सर्व्हीस रायफल ए.के.47 द्वारे स्वत:च्या वरिष्ठासह अन्य तीन प्रवासी अशी चार जणांची निर्घुण हत्या करणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंग याची चौकशी सुरु झाली आहे. परंतू घटनेप्रसंगी धावत्या एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या भयानक हत्याकांडाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर आरोपीची मानसिक स्थिती ठीक नव्हती तर त्याला प्रवाशांच्या सुरक्षेची ड्यूटी का दिली ? असा सवाल केला जात आहे. त्याला पाहून आपल्या अजमल कसाबची आठवण झाल्याचे एका साक्षीदाराने म्हटले आहे. तसेच क्षणिक रागाच्या भरात एखादा व्यक्ती वेग-वेगळ्या डब्यातील लोकांना कसे टार्गेट करु शकतो असाही सवाल केला जात आहे.
जयपूरहून मुंबईला येणाऱ्या एक्सप्रेसमध्ये सोमवारी एएसआय टीकाराम आणि तीन प्रवाशांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या आरोपी कॉन्स्टेबल चेतन याची चौकशी सुरु आहे. यावेळी या ट्रेनमध्ये ड्यूटीवर हजर असलेले कोच अटेडंडने सांगितले की आरोपी कॉन्स्टेबल चेतनला पाहून मुंबईवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची आठवण झाल्याचे सांगितले.
सोमवारी हा भयंकर प्रकार घडला त्यावेळी अटेडंड कृष्ण कुमार शुक्ल हे ट्रेनमध्ये हजर होते. त्यावेळी आरोपी चेतन सिंग ज्याप्रकारे आवेशाने गन घेऊन सज्ज होता ते पाहून दहशतवादी अजमल कसाबची आठवण झाल्याचे ते म्हणाले. कृष्ण कुमार शुक्ल 12 वर्षे ट्रेन अटेडंट म्हणून काम करतात. हे एका वाईट स्वप्नासारखे वाटत आहे.
बोगीला बाहेर बंद केले
शुक्ला ट्रेनच्या बोगी क्रमांक B5 मध्ये होते. त्यांनी गोळ्यांचा आवाज ऐकला तेव्हा त्यांना सुरुवातीला हा गोळीचा आवाज नसावा असे वाटले. परंतू नंतर त्यांनी एएसआय टीकाराम मीना यांना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले पाहीले. आरोपी चेतन काही मिनिटे मृतदेहाला निरखून पाहत होता. त्यानंतर प्रवासी प्रचंड भेदरलेले होते. त्यानंतर प्रवाशांनी B5 बोगीला बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यात कोणी जाऊ नये किंवा त्यातून कोणी बाहेर येऊ नये म्हणून काळजी घेतली. जेव्हा बोरीवली स्थानकात जीआरपी पोलिस ट्रेनमध्ये आले तेव्हाच आपण बाहेर पडल्याचे शुक्ला यांनी आजतकशी बोलताना म्हटले. बोरीवलीत अन्य मृतदेहांना पाहीले, खूपच भयंकर घटना होती. आपण रात्री झोपू शकलो नाही असेही ते म्हणाले.
पॅण्ट्रीकारपर्यंत नेऊन संपवले
चेतन याने एका प्रवाशाला बंदूकीच्या इशाऱ्यावर B 2 बोगीतून पॅण्ट्रीकारपर्यंत नेले. त्यानंतर तेथेच त्याची गोळ्या घालून हत्या केली. पॅण्ट्री कार B2 बोगीहून दोन कोच पुढे आहे. जीआरपीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग B 2 मधून प्रवास करणाऱ्या प्रवासी सैयद एस. याला बंदूक दाखवत पॅण्ट्रीकारपर्यंत नेले. नंतर तेथे जाऊन त्याची हत्या केली. यावेळी सहप्रवासी त्याला पाहत होते. कोणी काही करु शकले नाही सर्वजण भेदरलेले होते.