क्रिकेट सामन्यात राडा, MIM च्या नेत्याचा गोळीबार, एकाचा मृत्यू

एमआयएम नेत्याच्या गोळीबारात जखमी झालेल्या जमीर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (MIM leader firing)

क्रिकेट सामन्यात राडा, MIM च्या नेत्याचा गोळीबार, एकाचा मृत्यू
क्राईम
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 6:16 PM

हैदराबाद: तेलंगणामध्ये 18 डिसेंबरला क्रिकेट मॅचवरुन दोन गटात राडा झाला होता. यामध्ये एमआयएमच्या एका नेत्यानं गोळीबार केला होता. एमआयएम नेत्याच्या गोळीबारात जखमी झालेल्या जमीर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आदिलाबाद मधील टाटीगुडा येथील माजी नगरसेवक 52 वर्षीय सय्यद जमीर यांचा हैदराबादच्या निजाम आयुर्विज्ञान संस्थान येथे मृत्यू झाला. (A person from Telangana Adilabad injured in MIM leader firing was died )

आदिलाबादमध्ये टाटीगुडामध्ये 18 डिसेंबरला क्रिकेटची मॅच सुरु होती. या सामन्यावेळी वाद झाल्यानंतर दोन्ही गटात भांडणं सुरु झाली. मोहम्मद फारूक अहमद या एमआयएमच्या नेत्यानं त्याच्याकडील लायन्सस असणाऱ्या बंदुकीतून गोळीबार सुरु केला. यामध्ये सय्यद जमीर, त्यांचा भाऊ सय्यद मन्नान आणि सय्यद मोहतेसीन जखमी झाले होते. यावेळी चाकूचा देखील वापर करण्यात आला होता. जमीर मोहतेसीन यांना गोळ्या लागल्या होत्या. सय्यद मन्नानवर चाकूचा वार झाला होता. या घटनेत सय्यद जमीर गंभीर जखमी झाले होते.

सय्यद जमीर यांना हैदराबादला एम्स दाखल करण्यात आलं होते. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. शनिवार (26 डिसेंबर)ला सय्यद जमीर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. आदिलाबाद नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष मोहम्मद फारुक यांनी टाटीगुडा मध्ये विरोधी गटावर गोळीबार केला होता.

गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल

मोहम्मद फारुक यांनी गोळीबार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये फारुक हवेत गोळीबार करत आहेत तर दुसऱ्या हातात चाकू असल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी मोहम्मद फारुक यांना अटक करुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. सय्यद जमीर यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर फारुक यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात येईल. पोलिसांनी मोहम्मद फारूक यांच्या बंदुकीचे लायसन्स रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली आहे.

पूर्ववैमनस्यातून गोळीबार

क्रिकेट सामन्यातील वादावरुन दोन्ही गटात भांडण झाले असले तरी दोन्ही गटांमध्ये यापूर्वी देखील वाद झाले होते. त्यावादातूनच गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

संबंधित बातम्या:

नागपुरात थेट किचनमध्ये घुसून केटरर्सची निर्घृण हत्या, पोलिसांकडून दोघे संशयित ताब्यात

रेखा जरे हत्याप्रकरण: आरोपी बाळ बोठेला मदत करणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक

(A person from Telangana Adilabad injured in MIM leader firing was died )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.