500 रुपयांसाठी शिर कापले, स्वत: मुंडक हातात घेऊन तब्बल 25KM चालत पोलिस ठाण्यात गेला आणि….

फुटबॉल सामन्यासाठी अवघ्या 500 रुपयांच्या अटीवरून वाद झाला. यानंतरच हे हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगीतले. आरोपीने आपल्याच गावातील एका व्यक्तीचा शिर कापून खून केला आहे. या क्रूर कृत्यानंतर तो सुमारे 25 किलोमीटर दूर असलेल्या पोलिस ठाण्यात स्वत: चालत गेला आणि त्याने आत्मसमर्पण केले.

500 रुपयांसाठी शिर कापले, स्वत: मुंडक हातात घेऊन तब्बल 25KM चालत पोलिस ठाण्यात गेला आणि....
Pune : तीक्ष्ण हत्याराने वार करून पुण्यात महिलेची हत्या, कारण अस्पष्ट Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 6:55 PM

दिसपूर : अवघ्या 500 रुपयांसाठी एका व्यक्तीचे शीर कापले आहे. आसाम(Assam) मध्ये ही थरारक घटना घडली आहे. शीर छाटून हत्या केल्यानंतर आरोपी ते कापलेलं मुंडक हातात घेऊन स्वत: पोलिस ठाण्यात गेला. विशेष म्हणजे ज्या गावात ही घटना घेडली तेथून पोलिस ठाणे तब्बल 25 किमी दूर होते. आरोपी शीर हातात घेऊन पोलिस ठाण्यात चालत गेला. व्यक्तीच्या हातात शिर पाहून नागरीक चांगलेच भयभित झाले. पोलिस तपासात हत्या करण्यामागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे.

फुटबॉल सामन्यासाठी अवघ्या 500 रुपयांच्या अटीवरून वाद झाला. यानंतरच हे हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगीतले. आरोपीने आपल्याच गावातील एका व्यक्तीचा शिर कापून खून केला आहे. या क्रूर कृत्यानंतर तो सुमारे 25 किलोमीटर दूर असलेल्या पोलिस ठाण्यात स्वत: चालत गेला आणि त्याने आत्मसमर्पण केले.

उत्तर आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील एका खेडेगावात सोमवारी ही घटना घडली. या गावात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपीने मृत व्यक्तीकडे 500 रुपयांचे कर्ज मागितले होते. परंतु त्याने पैसै देण्यास नकार दिला होता त्यावरुन यांच्यात वाद झाला.

फुटबॉल सामन्यानंतर बकरा बक्षीस म्हणून जिंकणारा आरोपी तुनिराम माद्री याने बोइला हेमराम याला त्याच्यासोबत कत्तलखान्यात जाण्यास सांगितले. हेमरामने नकार दिला. यामुळे तुनिराम माद्री संतापला आणि त्याने हेमरामवर हल्ला केला. हेमरामची हत्या केल्यानंतर तुनिराम त्याचे मुंडके छाठले. हे छाटलेले डोके घेऊन तो घरी पोहोचला. तेथे त्याच्या मोठ्या भावाने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

यानंतर तुनिराम माद्री याने 25 किमी चालत पोलिस स्टेशन गाठले आणि कापलेल्या शिरसह आत्मसमर्पण केले. तुनिरामने हेमरामची हत्या केलेल्या कुऱ्हाडीसारखे हत्यारही पोलिसांना दिले. सध्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. हातात मानवी मुंडक घेऊन आलेला आरोपी पाहून पोलिसांनाही धक्का बसला. यानंतर आरोपीने आत्मसपमर्ण करत हत्येची कबूली दिली. तसेच हत्येचे कारणही पोलिसांना सांगीतले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.न

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.