एका कैद्याला त्याचे मोबाईल वेड असे भारी पडले की…

कैद्यांचा बाहेरच्या जगाशी काही संबंध येत नाही. तरीही काही वेळा तुरूंगात बंदी असलेल्या वस्तू सापडतात. एका कारागृहात एका कैद्याने मोबाईल आत नेला होता. नेमके काय घडले पाहूया...

एका कैद्याला त्याचे मोबाईल वेड असे भारी पडले की...
mobile-jailImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 7:34 PM

नवी दिल्ली : बिहारच्या कारागृहात अजीब घटना घडली आहे. जेलमध्ये बंद असलेल्या एक कैद्याने असा काही कारनामा केला की त्यामुळे जेल प्रशासनावरच संशय निर्माण झाला आहे. गोपाळगंजच्या जेलमधील एका कैद्याने त्याच्या पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाला, परंतू त्यामुळे एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. त्याच्या पोटाचा एक्सरे काढला असता त्याच्या पोटात चक्क मोबाईल असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डॉक्टरांसह पोलीसही हैराण झाले…

या कैद्याची चौकशी झाली असता त्याने चौकशीत त्याने त्याच्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी चायनाचा एक मोबाईल तुरूगांत लपून आणल्याचे मान्य केले आहे. एकदा तुरूंगात झडती सुरू असताना त्याने पकडले जाण्याच्या भितीने तो मोबाईलच गिळल्याचे मान्य केले आहे. या कैद्याचे नाव कैसर अली ( 27 ) असे असून त्याला एनडीपीएस कायद्याखाली अटक झाली होती.

कैसर अली याला सुरूवातीला गोपालंग येथील रूग्णालयात दाखल केले होते. परंतू मोबाईल त्याच्या पोटात अडकल्याचे समजल्यानंतर त्याची तातडीने पाटनाला रवानगी करण्यात आली आहे. एक दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर कैसर अलीच्या पोटातून कोणतेही ऑपरेशन न करता हा मोबाईल काढण्यात यश मिळविले आहे.

आयजीआयएमएसचे अधिक्षक डॉ.मनीष मंडळ यांनी सांगितले की आधी गोपाळगंज रूग्णालयातून या कैद्याला सोमवारी पीएमसीएचला पाठविले. परंतू तेथे एंडोस्कोपीची सुविधा नसल्याने त्याला मंगळवारी आयजीआयएमएसला आणण्यात आले. त्यानंतर त्याची तपासणी गॅस्ट्रोइंट्रोलॉजी विभागाचे डॉ. आशीष झा यांनी केली. डॉ. झा आणि त्या टीमने बुधवारी एंडोस्कोपीद्वारे त्याच्या तोंडातून अन्ननलिकेच्या आत अडकलेला मोबाईल काढण्यात यश आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपल्या 20 वर्षांच्या सर्व्हीसमध्ये मोबाईल गिळल्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मोबाईल अन्ननलिकेत अडकल्याने या कैदी पाणी देखील नीट पिवू शकत नव्हता. प्रचंड वेदनांमुळे तो तडफडत होता, अखेर त्याच्यावरील उपचाराला यश येऊन कोणत्याही चिरफाडशिवाय त्याला जीवदान मिळाले आहे.

3.5 इंच लांब आणि 2 इंच रूंदीचा मोबाईल

कैद्याने गिळलेला मोबाईल 3.5 इंच लांब आणि 2 इंच रूंदीचा होता. तो चायनीझ कंपनीचा होता. अन्ननलिकेत अडकल्याने कैद्याची स्थिती बिकट झाली होती, जर आणखी काही वेळ गेला असता तर त्याच्या जीवावर बेतले असते. आता मोबाईल अन्ननलिकेतून काढल्यावर त्याला हायसे वाटत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.