लघुशंकेवरून हटकल्याच्या रागातून गाडी अंगावर घातली, मग एक किमीपर्यंत फरफटत नेले !

बिअर घेण्यासाठी आलेल्या तरुणांचा क्षुल्लक कारणातून रेस्टॉरंटच्या मॅनेजरसोबत वाद झाला. यानंतर आरोपींनी जे केले ते पाहून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

लघुशंकेवरून हटकल्याच्या रागातून गाडी अंगावर घातली, मग एक किमीपर्यंत फरफटत नेले !
क्षुल्लक वादातून मॅनेजरला बोनेटवरुन फरफटत नेलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 3:24 PM

नवी मुंबई : रेस्टॉरंटसमोर लघुशंका करण्यावरुन हटकल्याच्या रागात अज्ञात लोकांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. मारहाणीनंतर मॅनेजरला गाडीच्या बोनेटवरुन एक किमी फरफटत नेले. नवी मुंबईतील तुर्भे येथे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

काय आहे प्रकरण?

तुर्भे येथील म्युझिक बारमध्ये एक तरुण बिअर घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा एक साथीदार गाडीतून खाली उतरला. तो तरुण रेस्टॉरंटसमोरच लघुशंका करु लागला. यावेळी रेस्टॉरंटच्या मालकाने त्याला रोखले. यामुळे तरुणांना राग आला. रागाच्या भरात ते मॅनेजरला शिवीगाळ आणि मारहाण करु लागले. यावेळई एका व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली.

एक किमी बोनेटवरुन मॅनेजरला फरफटत नेले

यानंतर दोघेही गाडीत बसले आणि मॅनेजरच्या अंगावर गाडी घातली. यावेळी स्वतःचा बचाव करताना मॅनेजरने गाडीच्या बोनेटवर उडी घेतली. आरोपींनी गाडीच्या बोनेटवर एक किमीपर्यंत मॅनेजरला फरफटत नेले. त्यानंतर मॅनेजर खाली पडला. आरोपी त्याला तिथेच सोडून पळून गेले. यानंतर पीडित मॅनेजरने एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.