Kalyan Boy Drowned : उल्हास नदीत बुडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, मित्रासोबत पोहायला गेला असता घडली घटना

नदीच्या पात्रामध्ये उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून जाऊ लागला. त्याचा मित्र शर्मा याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही.

Kalyan Boy Drowned : उल्हास नदीत बुडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, मित्रासोबत पोहायला गेला असता घडली घटना
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 10:51 PM

कल्याण : शाळेच्या नावाखाली मित्रासोबत उल्हास नदी (Ulhas River)त पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्या (School Student)चा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. सूर्यदेव संतराज यादव असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उल्हासनगरमधील सेंचुरी हायस्कूलमध्ये शिकत होता. मयत विद्यार्थी शाळेत जातो सांगून घरुन निघाला. मात्र शाळेत न जाता वर्गमित्रासोबत नदीवर पोहायला गेला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी अधिक तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.

घरी शाळेत जातो सांगून मित्रासोबत पोहायला गेला

मयत सूर्यदेव कल्याणमधील धोबीघाट येथील राहणारा असून, शाळेत जातो सांगून वर्गमित्र आयर्न शर्मासोबत पावशेपाडा येथे उल्हास नदीत सकाळी 11 वाजता पोहण्यासाठी गेला होता. सूर्यदेव हा नदीच्या पात्रामध्ये उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून जाऊ लागला. त्याचा मित्र शर्मा याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. त्याने बराच आरडाओरडा केला परंतु तो परिसर निर्जन असल्यामुळे मदतीला कुणीच आले नाही. त्यामुळे तो धावत म्हारळ पोलीस चौकित गेला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलिस आणि समाजसेवक विवेक गंभीरराव यांनी तेथे जाऊन स्थानिकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने चार अथक प्रयत्न करुन मुलाचा शोध असता दुपारी 3 च्या दरम्यान सूर्यदेवचा मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आला. (A school student who went swimming drowned in Ulhas river)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.