लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवायचा, मग अश्लील चाळे करायचा !

महिलांच्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कितीही कायदे केले तरी या घटनांना आळा बसत नाही. नुकतीच नागपुरात घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवायचा, मग अश्लील चाळे करायचा !
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलांशी अश्लील वर्तन करणारा अटक
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 4:33 PM

नागपूर : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनी आणि महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पांडुरंग दांडेकर असे या आरोपीचे नाव आहे. दांडेकर पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. जेष्ठ नागरिकाच्या या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्याच्या विकृत मानसिकतेमुळे परिसरातील महिला आणि विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेचा वातावरण निर्माण झालं होतं. याआधी देखील त्याने चार ते पाच महिलांसोबत असे अश्लील चाळे केले आहेत. मात्र महिला किंवा विद्यार्थिनी पुढे आल्या नाहीत. पोलिसांनी आता आवाहन केलं आहे की, कोणासोबत अशी घटना घडली असल्यास पुढे यावे.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवायचा

गेल्या काही दिवसांपासून आरोपी पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हाने फिरायचा. बेलतरोडी परिसरात पायी जाणाऱ्या महिला आणि मुलींना हेरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोपेडवर बसवायचा. वृद्ध असल्याने त्याच्यावर कोणाला संशय येत नव्हता. मात्र तो त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा. याबाबत कोणाला सांगितलं तर ठार मारण्याची धमकी द्यायचा. घाबरलेल्या महिलांनी या संदर्भात पोलीस तक्रार केली नाही. मात्र काही दिवसाआधी एका 16 वर्षीय विद्यार्थिनीशी त्याने अशाच पद्धतीचे अश्लील चाळे केले.

एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर घटना उघड

विद्यार्थिनीने घडलेला हा प्रकार घरी सांगितला आणि आरोपीचे बिंग फुटले. पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली. पालकांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा अज्ञात व्यक्ती असल्याने पोलिसांना त्याला शोधण्यासाठी मोठी तांत्रिक मदत घ्यावी लागली. अखेर आरोपीला सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.