सात वर्षीय मुलाची आईच्या मित्राकडून इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या, कारण अस्पष्ट
विशेष म्हणजे पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून बिल्डींगचे सीसीटिव्ही तापसले.
कल्याण : शाळेतून सुटलेल्या 7 वर्षाच्या चिमुरड्याला परस्पर ताब्यात घेत आईच्या मित्राने इमारतीच्या गच्चीवरील (Terrace building) पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील सुंदर रेसिडन्सीमध्ये घडली आहे. मृत मुलाचं नाव प्रणव भोसले असं होतं. याप्रकरणी कल्याण (kalyan) खडकपाडा (Khadakpada) पोलिसांनी गुन्हा दखल करत आईचा मित्र नितीन कांबळे या आरोपीला ताब्यात घेतले आहे .
विशेष म्हणजे ज्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मुलाचा मृतदेह आढळला. त्याच इमारतीमध्ये आरोपी नितीन कांबळे काही महिन्यांपूर्वी वॉचमनचे काम करत होता. मुलाच्या हत्या झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपी बनाव करत होता.
मयत मुलाच्या आईने 50 हजार रुपये घेतले असून वारंवार मागणी करूनही ती पैसे परत देत नाही, अशी तक्रार आरोपीने पोलिसांकडे केली. परंतु त्याचवेळी मुलगा सापडत नसल्याने पोलिस चिंतेत होते. विशेष म्हणजे पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून बिल्डींगचे सीसीटिव्ही तापसले. सीसीटिव्ही आरोपी आणि मुलगा दिसत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपीने हत्येची कबूली दिली.
कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कविता भोसले नामक महिला ही सात वर्षीय मुलगा प्रणव भोसले यांच्यासोबत राहत होती. तिथेचं सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपी नितीन कांबळे याच्याशी मैत्री झाली. मात्र मागील काही दिवसांपासून त्याच्यात वाद सुरू झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.