पित्याची हत्या करुन आत्महत्येचा बनाव, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच

मुलानेच बापाची हत्या करुन आत्महत्येचा बनाव केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

पित्याची हत्या करुन आत्महत्येचा बनाव, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच
प्रेमाला विरोध करणाऱ्या भावाला प्रियकराच्या मदतीने संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 6:51 PM

पिंपरी चिंचवड : बाप दररोज प्रेयसीला शिवीगाळ करायचा म्हणून संतापलेल्या मुलाने बापाला संपवल्याची धक्कादायक घटना दिघी परिसरात उघडकीस आली आहे. बापाची गळा आवळून हत्या केली, मग मृतदेह पंख्याला लटकवत आत्महत्येचा बनाव केला. मात्र अखेर हा बनाव उघडकीस आला. या गुन्ह्यात आरोपीची आई आणि मोठ्या भावानेही साथ दिली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अशोक रामदास जाधव असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

वडिल प्रेयसीबाबत अपशब्द बोलायचे

जाधव कुटुंबीय हे दिघी परिसरातील समर्थ सदन इमारतीत राहते. रामदास जाधव हा आपल्या छोटा मुलगा अनिल जाधव याच्या प्रेयसीला शिवीगाळ आणि अपशब्द बोलायचा. यामुळे अनिलचा संताप झाला. संतापाच्या भरात त्याने बापाचा गळा आवळला. मग मोठा भाऊ आणि आईच्या मदतीने मृतदेह फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव केला. मात्र पोलीस तपासात सत्य उघडकीस आले.

आई आणि दोन मुलांना अटक

यानंतर अनिल जाधव याला हत्येप्रकरणी, तर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी राहुल जाधव आणि रामदासची पत्नी यांच्याविरोधात दिघी पोलिसात आई आणि दोन मुलांविरोधात कलम 302, 201 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.