AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावीचा पेपर कठिण गेला, पालक रागावतील म्हणून मुलीने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावले !

दहावीचा पेपर द्यायला गेलेली मुलगी जखमी अवस्थेत घरी परतली. मुलीची अवस्था पाहून पालकांनी तिच्यासह पोलीस ठाणे गाठले. मग पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असता जे समोर आले त्याने सर्वच हादरले.

दहावीचा पेपर कठिण गेला, पालक रागावतील म्हणून मुलीने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावले !
मानखुर्दमधील बेपत्ता चिमुकलीची सुटकाImage Credit source: Google
| Updated on: Mar 21, 2023 | 6:19 PM
Share

दिल्ली : पेपर कठिण गेला म्हणून आई-वडील रागावतील या भीतीने मुलीने जे केले त्यानंतर पालकच नाही तर पोलीसही चक्रावून गेले. दिल्लीतील भजनपुरा भागात दहावीची विद्यार्थिनी बोर्डाचा पेपर देण्यासाठी गेली होती. शाळेतून परतली तेव्हा तिच्या अंगावरचे कपडे फाटले होते. तसेच रक्तबंबाळ अवस्थेत होती. यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेत मुलीचे अपहरण करून विनयभंग केल्याची तक्रार केली. मात्र तपासानंतर जे उघडकीस आले त्यानंतर पोलीसही हैराण झाले.

काय आहे प्रकरण?

मुलीची दहावीची परिक्षा सुरु आहे. मुलीचा 15 मार्च रोजी “सोशल स्टडीज”चा पेपर होता. पण हा पेपर मुलीला कठिण गेला. पेपरमध्ये कमी गुण मिळाले तर आई-वडिल रागावतील या भीतीने मुलीने पालकांचा ओरडा टाळण्यासाठी एक योजना आखली. तिने स्वतःच स्वतःला इजा करुन घेतली. मग अपहरणाची कहाणी रचली.

घरी आल्यानंतर तिने पालकांना सांगितले की, ती शाळेतून परतत असताना तिला दोन-तीन अनोळखी मुलांनी अडवले. ते तिला कुठेतरी घेऊन गेले. तिचा विनयभंग केला आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तिच्या वैद्यकीय तपासणीबरोबरच DCW च्या सदस्याकडून तिचे समुपदेशनही करण्यात आले.

तपासादरम्यान सत्य उघडकीस

याप्रकरणी भजनपुरा पोलीस ठाण्यात अपहरण, शारीरिक शोषण आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. मुलीच्या जबानीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, पीडितेने सांगितलेल्या घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलीने सांगितलेला कोणताही प्रकार घडलेला दिसला नाही.

जेव्हा पोलिसांनी मुलीचे समुपदेशन केले तेव्हा मुलीने सत्य उघड केले. मुलीने सांगितले की, तिची दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे आणि तिला “सोशल स्टडीज” मध्ये चांगले यश मिळवता आले नाही. त्यामुळे पालक नाराज होतील या भीतीने तिने स्वत:ला इजा केली आणि अपहरणाचा बनाव पालकांकडे रचला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.