बंद ट्रॅक्टर अचानक सुरु झाला अन् चप्पलच्या दुकानात घुसला, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

दुकानाबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर अचानक सुरु झाला अन् थेट चप्पलच्या दुकानात घुसला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

बंद ट्रॅक्टर अचानक सुरु झाला अन् चप्पलच्या दुकानात घुसला, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
अचानक ट्रॅक्टर सुरु झाला अन्...Image Credit source: social
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 5:10 PM

बिजनौर : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चप्पलच्या दुकानाबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर अचानक आपोआप सुरु झाला. यानंतर ट्रॅक्टर थेट चप्पलच्या दुकानात घुसला. दुकानातील काचेचा दरवाजा तोडून ट्रॅक्टर आत घुसला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही जखमी झाले नाही. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती दुकानाबाहेर बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला.

मालकाने चप्पलच्या शोरुमबाहेर उभा केला होता ट्रॅक्टर

ही विचित्र घटना मंगळवारी सायंकाळी कोतवाली शहर पोलीस ठाण्यासमोर घडली. पोलीस ठाण्यात समाधान दिन सुरू होता, यासाठी अनेक नागरिक पोलीस ठाण्यात आले होते. काही जण दुचाकी, चारचाकी आणि ट्रॅक्टरमधूनही आले होते. किशन कुमार नावाच्या व्यक्तीने आपला ट्रॅक्टर चपलांच्या शोरूमबाहेर उभा केला होता आणि तो पोलीस ठाण्यात गेला होता.

तासाभरानंतर ट्रॅक्टर आपोआप सुरु झाला अन्…

शोरूमसमोर ट्रॅक्टर उभा करून जवळपास एक तास झाला होता. तासाभरानंतर साधारण पावणे चारच्या सुमारास ट्रॅक्टर अचानक सुरू झाला आणि समोर उभ्या असलेल्या सायकल आणि दुचाकीला उडवत शोरूमच्या काचेच्या गेटमधून आत घुसला. ही संपूर्ण घटना शोरूममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

दुकानातील व्यक्तीने सावधगिरी बाळगत ट्रॅक्टर नियंत्रित केला

ट्रॅक्टर आत येताना पाहताच शोरूममधील काउंटरवर बसलेला तरुण जागेवरुन उठून पळाला. मग बाहेर येऊन ट्रॅक्टरच्या मालकाचा शोध घेतो. गेट उघडताच काचेच्या गेटचा चक्काचूर होऊन ट्रॅक्टर शोरूममध्ये घुसला. दरम्यान, शोरूममध्ये उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने सावधगिरी बाळगून ट्रॅक्टरचा ब्रेक दाबला आणि दुसऱ्या व्यक्तीने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.