HORRIBLE: ट्रक चालकाने महिला पोलिस अधिकारीला चिरडले; जागीच मृत्यू झाला

रांची : ड्यूटीवर तैनात असणाऱ्या वाहतूक पोलिसांचा जीव धोक्यात असल्याचे निदर्शानास आणून देणाऱ्या अनेक घटना देशभरात घडत आहेत. अनेक वाहन चालक कायदा मोडून काढत याला विरोध करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरच जीवघेणे हल्ले करत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना झारखंडमध्ये(Jharkhand) घडली आहे. नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणीस विरोध करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका वाहन चालकाने […]

HORRIBLE: ट्रक चालकाने महिला पोलिस अधिकारीला चिरडले; जागीच मृत्यू झाला
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 6:30 PM

रांची : ड्यूटीवर तैनात असणाऱ्या वाहतूक पोलिसांचा जीव धोक्यात असल्याचे निदर्शानास आणून देणाऱ्या अनेक घटना देशभरात घडत आहेत. अनेक वाहन चालक कायदा मोडून काढत याला विरोध करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरच जीवघेणे हल्ले करत असल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना झारखंडमध्ये(Jharkhand) घडली आहे. नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणीस विरोध करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका वाहन चालकाने पोलिस अधिकारीला चिरडले आहे(A truck driver crushed). यात या अधिकारी महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हरयाणात एका पोलिस अधिकाऱ्याला ट्रकने चिरडून त्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच झारखंडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. झारखंडमधील रांची शहरात देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रांची शहरातील एका चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरु होती. यावेळी पळून जात असलेल्या एका ट्रक चालकाने थेट महिला पोलिस अधिकारीला चिरडले. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. संध्या टोपनो असे त्या महिला पोलिसाचे नाव आहे.

चेकपोस्टवरील CCTV कॅमेऱ्यात थरार कैद

तुपुदाना परिसरातील चेकपोस्टवर हा प्रकार घडला. बुधवारी रात्री या चेकपोस्टवर नेहमी प्रमाणे वाहनांची तपासणी केली जात होती. पोलिसांना प्राण्यांच्या तस्करीची माहिती मिळाली होती. त्यामुळे तुपुदाना येथे चेकपोस्टवर सर्व वाहनाची तपासणी होत होती. त्यावेळी टोपनो यांनी एका पिकअप व्हॅनला थांबण्याचा इशारा केला. मात्र त्या व्हॅनच्या ड्रायव्हरने न थांबवता पळून जायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने थेट संध्या यांच्या अंगावर ट्रक नेला आणि त्यांना चिरडले. यात संध्या यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या ट्रक चालकाने वाहनासह पळ काढला.

फरार ट्रक चालकाचा शोध

ट्रकच्या धडकेत संध्या यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर ट्रक चालकाने धूम ठोकली. पोलिस या फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं देखील रवाना झाली आहेत.

खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकाला डंपरने चिरडले

खाण माफियांकडून अधिकाऱ्यांवर हल्ले करणे, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकार सगळ्या देशभर घडत असतानाच हरियाणातील नूहमध्येही (Haryana Nuh) खाण माफियांकडून पोलीस उपअधीक्षकांना डंपरने चिरडल्याची दुर्घटना नुकतीच घडली आहे. खाण माफियांकडून (Mining Mafia) ज्यांच्या अंगावर डंपर घालून ठार करण्यात आले आहे, त्यांचे नाव पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र बिश्नोई (Police Deputy Superintendent Surendra Bishnoi) असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून अवैध खाणकामावर छापा टाकण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे, त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.