खेळायला आलेल्या दोन वर्षाच्या चिमुरडीसोबत आजोबाचे दुष्कृत्य, मानवतेला काळिमा फासणारी घटना

दोन वर्षीय चिमुकली नेहमीप्रमाणे आपल्या शेजारी असलेल्या घरी खेळण्यासाठी गेली होती. शेजारी असल्याने ती आजोबांना ओळखत होती. त्याच ओळखीचा फायदा शेजारी राहणाऱ्या आणि त्यास आजोबा म्हणणाऱ्या नराधामाने घेत तिच्यावर अत्याचार केले.

खेळायला आलेल्या दोन वर्षाच्या चिमुरडीसोबत आजोबाचे दुष्कृत्य, मानवतेला काळिमा फासणारी घटना
श्रीरामपूरमध्ये दोन वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 6:27 PM

अहमदनगर / मनोज गाडेकर (प्रतिनिधी) : घरी खेळायला आलेल्या शेजारच्या दोन वर्षाच्या चिमुकडीवर 65 वर्षाच्या आजोबाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात उघडकीस आली आहे. श्रीरामपूर पोलिसांनी नराधम आजोबाला बेड्या ठोकल्या आहेत. भास्कर मोरे असे अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबाचे नाव आहे. आरोपीविरोधात भादवि कलम 376 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, पोस्को कायदा कलम 4, 8 , 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे. मनावतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

नेहमीप्रमाणे शेजारी खेळायला गेली होती चिमुकली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपुर तालुक्यात 18 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी 2 वाजता दोन वर्षीय चिमुकली नेहमीप्रमाणे आपल्या शेजारी असलेल्या घरी खेळण्यासाठी गेली होती. शेजारी असल्याने ती आजोबांना ओळखत होती. त्याच ओळखीचा फायदा शेजारी राहणाऱ्या आणि त्यास आजोबा म्हणणाऱ्या नराधामाने घेत तिच्यावर अत्याचार केले.

मुलीला त्रास होऊ लागल्याने ती आईकडे रडत गेली

मुलीला त्रास होत असल्याने ती आईकडे रडत गेली. त्यानंतर मुलीसोबत काही तरी वाईट कृत्य झाल्याचं आईच्या लक्षात आले. त्यानंतर आई वडीलांनी थेट पोलीस स्टेशन गाठत नराधामाविरोधात गुन्हा दाखल केला. पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

14 वर्षीय मुलाचा पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

एका 14 वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या एका 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उरणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीला मुलाला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यावर आईने उरण पोलीस ठाण्यात येऊन सदर मुलाविरोधात तक्रार दाखल केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.