Kalyan Crime : दुचाकीस्वार तरुणांकडून भररस्त्यात चाकूची शो बाजी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चिंचपाडा रोडवरुन साकेत कॉलेजच्या दिशेने हे तरुण चालले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Kalyan Crime : दुचाकीस्वार तरुणांकडून भररस्त्यात चाकूची शो बाजी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
भररस्त्यात हातात चाकू घेऊन फिरणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरलImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 8:18 PM

कल्याण : पुण्यात कोयता गँगची दहशत सुरू असतानाच कल्याणमध्ये चाकू हातात घेतलेल्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे कल्याण शहरात खळबळ उडाली आहे. दुचाकीवर बसलेल्या तरुणांकडून चाकू नाचवत शो बाजी करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून, गाडी नंबरच्या सहाय्याने तरुणांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. अशा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

काय आहे व्हिडिओत?

दुचाकीवरुन चाललेल्या दोन तरुणांपैकी चालकाच्या मागे बसलेला तरुण हातातील चाकू दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कल्याण पूर्व चिंचपाडा 60 फूट रोड परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.

चिंचपाडा रोडवरुन साकेत कॉलेजच्या दिशेने हे तरुण चालले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा

दुचाकीच्या नंबरवरुन आरोपींचा शोध सुरु

व्हिडिओत दिसणाऱ्या दुचाकीच्या नंबरवर आरोपींना ट्रेस करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

नागपुरातही भल्या पहाटे तरुणांकडून हुल्लडबाजी

पहाटे कारमध्ये हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या तरुणांवर नागपुरमधील अंबाझरी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. हुल्लडबाजी करताना रील्स बनवून एकाने इन्स्टाग्रामवर टाकली होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.