घरगुती वादातून प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले, मग अपघाती मृत्यूचा बनाव करण्याचा प्रयत्न केला पण…
पूनम बालदेव असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पूनम आणि मयत विनोद यांच्यात नेहमी घरगुती कारणातून भांडणे व्हायची. पुनमचे विनोदचे मित्र राहुल कोळी आणि सागर कोळी यांच्यासोबत अनैतिक संबंध होते.
सूरत : घरगुती वादातून एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सूरत येथे उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर अपघात दर्शवण्यासाठी प्रियकरायच्या मदतीने महिने पतीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकला. मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे हे हत्याकांड उघडण्यास मदत झाली आहे. मृतदेह शहरातील डिंडोली परिसरातील प्रमुख पार्क ओवर ब्रिज खाली दिल्ली-मुंबई रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आला होता. विनोद बालदेव असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिचा प्रियकर आणि प्रियकराचा मित्र अशा तिघांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पूनम बालदेव असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पूनम आणि मयत विनोद यांच्यात नेहमी घरगुती कारणातून भांडणे व्हायची. पुनमचे विनोदचे मित्र राहुल कोळी आणि सागर कोळी यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. याच कारणातून नेहमीप्रमाणे 17 डिसेंबर रोजी विनोद आणि पूनममध्ये भांडण झाले.
या भांडणानंतर पूनमने राहुल आणि सागर यांच्यासोबत मिळून पतीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर हा अपघाती मृत्यू असल्याचा बनाव करण्याच्या आणि पोलिसांपासून बचाव करण्यासाठी मृतदेह रेल्वे ट्रॅकवर नेऊन टाकला.
मात्र मृतदेह रेल्वे ट्रॅकवर ठेवल्यानंतर जी ट्रेन आली, तिचा वेग अतिशय धीमा होता. यामुळे मोटरमनला रेल्वे ट्रॅकवर मृतदेह पडल्याचे दिसले. त्यानंतर मोटरमनमध्ये तात्काळ पोलिसांशी संपर्क करून याबाबत माहिती दिली.
तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होत मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनेचा तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र पोलीस सर्व्हिलन्सच्या आधारे आरोपी पत्नीपर्यंत पोहचले.
तसेच मृतदेह रिक्षात टाकून घेऊन जाताना तिघे जण सीसीटीव्हीत कैद झाले होते. या आधारे पोलिसांनी महिलेची कसून चौकशी करत अन्य दोन आरोपींपर्यंत पोहचले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.