Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीची स्वतःच्याच मुलीवर वाईट नजर, पत्नीने प्रियकराच्या मदतीने ‘असा’ काढला काटा

मुलीवर वाईट नजर टाकणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना धुळे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पतीची स्वतःच्याच मुलीवर वाईट नजर, पत्नीने प्रियकराच्या मदतीने 'असा' काढला काटा
धुळ्यात पतीच्या हत्ये प्रकरणी पत्नीसह चौघांना अटकImage Credit source: assault attack on woman and girl living in live in nashik incident treatment for both is underway
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 2:20 PM

धुळे : थाळनेर पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या त्या हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. मुकेश बारेला या मध्यप्रदेश राज्यातील व्यक्तीचा खून करण्यात आला होता. पोलीस तपासात मुकेशचा खून त्याच्या फारकत झालेली पत्नी, तिचा दुसरा नवरा आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांनी केल्याचे उघड झाले. मुकेश आपल्या दोन मुलांना मारहाण करतो आणि स्वतःच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहतो म्हणून त्याच्या पत्नीने दुसऱ्या नवऱ्याशी संगनमत करून मुकेशच्या खून केला. पोलिसांनी या प्रकरणी सुशील पावरा, दिनेश कोळी, जितू पावरा या तिघांसह मयताच्या पुर्वश्रमीच्या पत्नीला अटक केली आहे.

मक्याच्या शेतात आढळला होता मृतदेह

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तरहाडी गावातील गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतातून एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचे हात बांधलेले होते. त्यावरून संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांना सहज आला. मृतदेह सापडल्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या हत्येबाबत कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांना पुढील तपासात अडचणी येत होत्या.

‘असा’ लावला हत्याकांडाचा छडा

मृत व्यक्तीच्या खिशातून राज्य परिवहन बसचे तिकीट सापडले. या तिकिटामुळे धुळे पोलिसांचे पथक थेट मध्य प्रदेश आणि गुजरातमधील पोरबंदरपर्यंत पोहोचले. मृत व्यक्तीने परिधान केलेल्या अंगठीत मुकेश हे नाव लिहिले होते, परंतु मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती यामुळे अक्षरे वाचण्यास कठीण झाले होते. मिळालेल्या तिकिटावरुन मयत इसम चोपडाहून शिरपूरला आल्याची माहिती मिळाली.

हे सुद्धा वाचा

तिकिटात नोंदवलेल्या तारखेच्या आधारे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज काढून तपासले. या फुटेजमध्ये एक महिला पुरुषासोबत बसलेली दिसत होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुकेश बरेली याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सुशील उर्फ ​​मुसळ्या जयराम पावरा, दिनेश उर्फ ​​गोल्या वासुदेव कोळी आणि जीतू उर्फ ​​तुंगाऱ्या लकडे पावरा यांचा सहभाग असल्याचे उघड झाले. हे सर्व आरोपींना गुजरातमधील पोरबंदर येथून अटक केली.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.