रात्री दुकान बंद करुन घरी चालले होते, अचानक दुचाकीवरुन आलेल्या इसमांकडून गोळीबार, मग…

नेहमीप्रमाणे काल रात्री कालेश्वर आगरिया आणि दिपक जगदाळे हे दोघे दुकान बंद करुन घरी चालले होते. त्यांच्याकडे दुकानातील दिवसभर जमा झालेली 3 लाख 78 हजारांची रक्कम होती. दोघेजण घरी जात असतानाच अचानक पाठीमागून दुचाकीवरून तिघे जण आले.

रात्री दुकान बंद करुन घरी चालले होते, अचानक दुचाकीवरुन आलेल्या इसमांकडून गोळीबार, मग...
खेड-शिवापूरमध्ये गोळीबार करत वाईन शॉप मालकाला लुटलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 9:54 AM

पुणे / विनय जगताप (प्रतिनिधी) : पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरच्या हद्दीत, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गोळीबार करत 3 लाख 78 हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. सोनल वाईन्स या मद्यविक्री दुकानीतील रोकड, रात्री दुकानं बंद केल्यानंतर घरी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या प्रकरणी 3 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड शिवापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिक तपास करत आहेत. कालेश्वर आगरिया आणि दिपक जगदाळे अशी लुटण्यात आलेल्या दुकानमालकांची नावे आहेत.

नेहमीप्रमाणे दुकान बंद घरी चालले होते दुकान मालक

खेड शिवापूरजवळ सोनल वाईन्स हे मद्यविक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे काल रात्री कालेश्वर आगरिया आणि दिपक जगदाळे हे दोघे दुकान बंद करुन घरी चालले होते. त्यांच्याकडे दुकानातील दिवसभर जमा झालेली 3 लाख 78 हजारांची रक्कम होती. दोघेजण घरी जात असतानाच अचानक पाठीमागून दुचाकीवरून तिघे जण आले.

दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार करत पैशाची बॅग हिसकावली

दुचाकीवरुन आलेल्या या तिघा जणांनी पैसे असणारी बॅग पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र कालेश्वर यांनी विरोध केला. यामुळे चोरट्यांनी आपल्या जवळील पिस्तुल काढले आणि दोन गोळ्या फायर करत दहशत निर्माण केली. यानंतर मालकाच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून पळ काढला.

हे सुद्धा वाचा

खेड-शिवापूर पोलिसात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडित मालकांनी खेडशिवापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत फिर्याद दिली. पीडितांच्या फिर्यादीनुसार खेड-शिवापूर पोलिसांनी अज्ञात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे आणि कर्मचारी करत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.