एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत महिला डॉक्टरला गंडा, तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक

मुंबई पोलीस किंवा एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगितले. मग कारवाईची धमकी देत वेगवेगळ्या खात्यात पैसे मागवत करोडोची फसवणूक केली.

एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत महिला डॉक्टरला गंडा, तब्बल 'इतक्या' कोटींची फसवणूक
एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत महिला डॉक्टरची फसवणूकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 10:47 PM

नवी दिल्ली : आर्यन खान प्रकरणामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत अँटी नार्कोटिक्स ब्युरो अर्थात एनसीबी ही केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा चर्चेत आली आहे. या तपास यंत्रणेतील आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी असल्याचा बनाव करून भामट्यांनी दिल्लीतील एका डॉक्टर महिलेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. महिला डॉक्टरची तब्बल साडेचार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिला डॉक्टरशी स्काईपवर बोलून वेगवेगळ्या खात्यात पैसे जमा करून घ्यायचे, असेही पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. हा संपूर्ण प्रकार फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिला डॉक्टरने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर टीमकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला.

महिलेची दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे धाव

पीडित महिला डॉक्टरला सुरुवातीला कुठलाही संशय आला नव्हता. त्यामुळे ती भामट्यांच्या बतावणीला बळी पडली होती. मात्र नंतर भामट्यांच्या संभाषणात काहीतरी गडबड असल्याचे आणि ते मुंबई पोलीस दल वा एनसीबीचे अधिकारी नसल्याचा संशय बळावला. त्या संशयावरून महिला डॉक्टरने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे रीतसर तक्रार केली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

भामट्यांकडून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात

भामट्यांनी 5 मे रोजी सकाळी 10.40 वाजता महिला डॉक्टरला पहिल्यांदा फोन कॉल केला होता. महिला डॉक्टरचे मुंबईहून तैवानला पाठवलेले पार्सल फेडएक्समध्ये अडकले आहे. ते एनसीबीने जप्त केले आहे. या पार्सलमध्ये कपडे, पासपोर्ट, बँकेची कागदपत्रे, शूजचे 2 जोड आणि 140 ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचे फोन कॉलवरून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

महिलेने अशा प्रकारच्या पार्सलबाबत माहिती नसल्याचे उत्तर दिले. त्यावर भामट्यांनी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ड्रग्जमधून कमावलेली रक्कम स्वतःकडे ठेवली आहे का, अशी विचारणा करून महिलेला कारवाईची धमकी देण्यात आली. त्यानंतर कधी अंधेरी पोलीस ठाण्यातील अधिकारी तर कधी एनसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून धमकावण्यास सुरुवात केली. तसेच महिलेला अंधेरी पूर्व पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यास सांगितले.

आरोपींचा स्काईपद्वारे महिलेशी संपर्क

आरोपींपैकी एकाने आपण अंधेरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पाटील असल्याची बतावणी केली. तसेच महिलेला स्काईपद्वारे संपर्क साधण्यास सांगितले आणि तिला धमकावण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. इतकेच नव्हे तर महिलेला तिच्या आधार आयडीवर मुंबईत 23 बँक खाती उघडल्याचे सांगितले. यातील अनेक खाती मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकली आहेत, असे सांगून महिलेकडे तिच्या बँक खात्याचा तपशील मागितला. त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या खात्यांमध्ये साडेचार कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडल्याचे उघड झाले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.