पत्नी इंदूरमध्ये आत्महत्या करत होती, पती छत्तीसगडमध्ये लाईव्ह पाहत होता; मग…

सीसीटीव्ही पाहताच पतीला धक्का बसला. करुणा तिच्या खोलीत आत्महत्या करत होती. पतीने तात्काळ घराजवळ राहणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीला याची माहिती दिली.

पत्नी इंदूरमध्ये आत्महत्या करत होती, पती छत्तीसगडमध्ये लाईव्ह पाहत होता; मग...
रॉ अधिकाऱ्याची दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 6:14 PM

इंदूर : इंदूरमध्ये एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. इंदूरमध्ये एका इंटिरियर डिझायनर महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे महिला जेव्हा आत्महत्या करत होती, तेव्हा तिचा पती छत्तीसगडमध्ये मोबाईलवर पत्नीला आत्महत्या करताना लाईव्ह पाहत होता. त्याने तात्काळ आपल्या ओळखीच्या लोकांना याबाबत सांगितले आणि आपल्या घरी जाण्यास सांगितले. मृत्यूपूर्वी महिलेने एक 10 पानी सुसाईड नोट लिहिली आहे. यात तिने अनेक हायप्रोफाईल लोकांवर आरोप केले आहेत.

इंटिरियर डिझायर होती महिला

करुणा शर्मा असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. ती पेशाने इंटिरियर डिझायनर होती. इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन हद्दीतील स्कीम क्रमांक 114 मध्ये ती राहत होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

भिशीच्या पैशावरुन घडली घटना

करुणा हायप्रोफाईल सोसायटीतील महिला होती. भिशी फंडातील आर्थिक व्यवहारातूनच ही घटना घडल्याचा अंदाज आहे. करुणा एका भीशी फंड चालवणाऱ्या ग्रुपशी संबंधित होती. ही भिशी करोडो रुपयांची होती. भिशीचे पैसे देण्यासाठी करुणावर दबाव होता.

हे सुद्धा वाचा

ज्यांचे पैसे या भिशीत अडकले होते ते पैसे परत मिळवण्यासाठी करुणावर दबाव टाकत होते. मात्र लोकांचे पैसे परत करण्यास ती असमर्थ होती.

दोन महिन्यांपूर्वी पैशावरुन काही लोकांनी धमकावलेही होते

दोन महिन्यांपूर्वी भिशीच्या पैशासाठी काही लोकांना तिला घरी येऊन धमकावलेही होते. त्यावेळी करुणाने पोलिसात तक्रारही दिली होती. यानंतर करुणा शहर सोडून गेली. मंगळवारी संध्याकाळीच ती इंदूरला पोहचली आणि तिने आत्महत्या केली.

पत्नीने फोन उचलला नाही म्हणून पतीने सीसीटीव्ही तपासले

करुणाचा पती पेशाने अभियंता असून, तो छत्तीसगडमधील भिलाई येथे राहत होता. करुणाला सात वर्षांची मुलगी असून, ती ही पतीसोबत राहत होती. मंगळवारी रात्री पतीने करुणाला फोन केला. मात्र करुणाने फोन उचलला नाही, म्हणून पतीने मोबाईलवरील सीसीटीव्ही अॅप चालू केले.

सीसीटीव्ही पाहताच पतीला धक्का बसला

सीसीटीव्ही पाहताच पतीला धक्का बसला. करुणा तिच्या खोलीत आत्महत्या करत होती. पतीने तात्काळ घराजवळ राहणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीला याची माहिती दिली. लोक घरी पोहचून दरवाजा तोडून आत शिरेपर्यंत करुणाचा मृत्यू झाला होता.

यानंतर लासुडया पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. घटनास्थळावरून पोलिसांना दहा पानी सुसाईड नोट सापडली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.