स्टेशनवरुन आटोपून घरी जाण्यासाठी महिलेने बस पकडली, तिकिटाचे पैसे काढण्यासाठी पर्स तपासली तर…

गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांचा स्टेशन परिसरात सुळसुळाट झाला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

स्टेशनवरुन आटोपून घरी जाण्यासाठी महिलेने बस पकडली, तिकिटाचे पैसे काढण्यासाठी पर्स तपासली तर...
साताऱ्यात किरकोळ वादातून मायलेकीला मारहाण
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 12:13 PM

कल्याण : गुन्हेगारीमध्ये कल्याण-डोंबिवली नाव नेहमीच चर्चेत असते. रोज काही ना काही गुन्हे कल्याणमध्ये उघडकीस येत असतात. स्टेशन परिसरात केडीएमसीच्या बसमध्ये एका महिलेला लुटल्याची घटना आज उघडकीस आली आहे. कल्याण स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीचा फायदा प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. अशीच घटना एका सेवानिवृत्त महिलेसोबत घडली आहे. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला प्रवाशाची पर्स लंपास केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.

बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेची पर्स लांबवली

कल्याण स्टेशन परिसरात काही कामानिमित्त मिथिलेश दीपक बारगल ही महिला आली होती. काम आटोपून आंबिवलीला आपल्या घरी जाण्यासाठी तिने कल्याण स्थानकातून बस पकडली. बसमध्ये गर्दी असल्याने त्यांनी दागिने आणि रोकड असलेली पर्स काखेत अडकवून ठेवली होती. यावेळी एक चोरटा बसमध्ये घुसला. त्याने महिलेला काही कळायच्या आत तिच्या काखेतील पर्स खेचून पसार झाला. पर्समध्ये 29 हजार 700 रुपयांची रोकड होती. तिकिट काढण्यासाठी महिला पैसे काढण्यासाठी गेली असता आपली पर्स चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात आले.

महिलेने थेट महात्मा फुले पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करत चोरट्याचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, या लुटीच्या घटनांना आळा घालण्यासानी पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.