Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Accident : रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या महिलेला ठामपाच्या बसने चिरडले, महिला गंभीर जखमी

सऱ्या मार्गिकेवर जाण्यासाठी बसने वळण घेताच दुभाजकाजवळ उभी असलेली महिला बसच्या मागच्या चाकाखाली आली. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Thane Accident : रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या महिलेला ठामपाच्या बसने चिरडले, महिला गंभीर जखमी
ठाण्यात ठामपाच्या बसने महिलेला चिरडलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 4:54 PM

ठाणे : ठाणे शहरात अनेक ठिकाणी विविध रस्त्यांचे काम सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेला आहे. या बदलण्यात आलेल्या प्रस्थानामुळे परिवहन सेवेची मार्गिका देखील बदलण्यात आली आहे. यामुळे रस्ते अपघात घडत आहेत. असाच एक भयंकर अपघात ठाण्यातील सावरकर नगर येथे उघडकीस आला आहे. एका मार्गिकेवरुन दुसऱ्या मार्गिकेवर वळण घेत असलेल्या बसच्या मागच्या चाकाखाली येऊन एक महिला गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आशा मोरे असे जखमी महिलेचे नाव आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात होती बस

लोकमान्य नगर बस डेपोतून सुटलेली ठाणे परिवहन मंडळाची ही बस ठाणे रेल्वे स्थानकाकडे चालली होती. यादरम्यान लोकमान्य ते नितिन कंपनी दरम्यान सावरकरनगर येथे येताच बस मार्गिका बदलत होती. यावेळी अपघाताची धक्कादायक घटना घडली.

बसने वळण घेत असतानाच महिला चाकाखाली आली

याचवेळी जखमी आशा मोरे या रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ उभ्या होत्या. दुसऱ्या मार्गिकेवर जाण्यासाठी बसने वळण घेताच दुभाजकाजवळ उभी असलेली महिला बसच्या मागच्या चाकाखाली आली. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अपघातात महिला गंभीर जखमी

या अपघातात महिलेच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेला उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हिंगोलीत सलग दुसऱ्या दिवशी बसचा अपघात

हिंगोलीतील सलग दुसऱ्या दिवशी बसला अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नांदेड-हिंगोली मार्गावर कळमनुरी तालुक्यातील मसोड शिवरात बसचा पाटा तुटल्याने बस पलटी झाली. सालवाडीवरून कळमनुरीकडे बस चालली होती. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह 17 ते 18 प्रवासी होते. अपघातात विद्यार्थ्यांसह 8 प्रवासी जखमी झाले आहेत.

आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.